चिमुरात सावित्रीबाई फुले स्मृतिदिन सोहळा संपन्न

57

✒️सुयोग डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.11मार्च):-महात्मा ज्योतिबा फुले माळी समाजसेवा मंडळ चिमूरच्या वतीने दि. १० मार्चला अभ्यंकर मैदानावर त्यागमूर्ती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन सोहळा संपन्न झाला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष भद्रीनाथ देसाई गुरुजी यांचे हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याना माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी माजी सरपंच बाळू बोभाटे, संजय देसाई, लोमेश बनकर, गणेश लोथे, संतोष वानखेडे, प्रदीप नंदरधने, नीरज बनकर, मनोहर मेश्राम, श्रीहरी साखरकर, दादू बनकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष भद्रीनाथ देसाई गुरुजी यांनी सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हें तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. या व्यतिरीक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हंटल्या जातं. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरिता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता जीवन खर्ची घातले. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतांना सावित्रीबाईंना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी हार मानली नाही आणि धैर्य खचु न देता संपुर्ण आत्मविश्वासाने संघर्षाला सामोरे गेल्या आणि यश मिळवले असे मत व्यक्त केले