मुस्लिम लोकांचे धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी वसीम रिजवी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावे :- सय्यद अब्बास

36

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.13मार्च):- शहर पोलीस स्टेशन येथे वसीम रिजवी विरुद्ध तक्रार अर्ज देण्यात आले. वसीम रिजवी यांनी यांने दिनांक ११/०३/२०२१ रोजी लखनऊ उत्तर प्रदेश येथे राहणारे शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून इस्लाम धर्माची सर्वात पवित्र धर्मग्रंथ कुराण मध्ये बद्दल करून त्याच्यात असलेले आयता मधून एकूण 26 आयात वगळण्यात यावी अशी मागणी केली.

आम्हाला आशा आहे की सुप्रीम कोर्ट याची ही याचिका ऍडमिट न करता ते फेटाळून लावतील पण वसीम रिजवी यांनी याचिका दाखल केल्या नंतर माध्यमांना बोलताना कुरान व मुसलमानांचे सुरुवातीचे तीन खलिफा विरुद्ध अनेक खोटे व बिनबुडाचे आरोप लावले मुख्यत:त्याने सांगितले की, कुरान हे आतंकवादी ची शिकवण देते व इस्लामचे सुरुवातीचे तीन खलिफा यांनी ताकतिचा प्रयोग करून इस्लामचा फैलाव केला कुरान मुळे मुस्लिम युवक आतंकवाद कडे वळत आहे वगैरे वगैरे वसीम रिजवी यांनी दिलेले मीडिया बाईटचे सर्वत्र पसरलेले आहे. व त्याचे बोलणे लोकांमध्ये अशी चुकीची माहिती अपप्रचार केल्यामुळे मुस्लिम धर्म व इस्लाम बाबत व इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम यांनी केले आहे.

वसीम रिजवी विरुद्ध भा.द.वी ची कलम २९५ व आयटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीचे तक्रार अर्ज परळी शहर पोलीस स्टेशन द्वारे मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई. व मा. पोलीस अधीक्षक साहेब बीड यांना देण्यात आले तक्रार अर्ज देताना अब्बास सय्यद,फेरोज खान, तोहीद शेख, जहीर शेख, शाहरुख खान, अशफाक भाई, शहेबाज भाई, मुदस्सीर भाई, अबुजर भाई व इतर जण उपस्थित होते