संत रविदास प्रतिष्ठान तर्फे मदन हातागळे सत्कारीत

28

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)मो:-9767177932

तलवाडा(दि.16मार्च):- येथील मातंग समाजाचे युवा कार्यकर्ते मदन हातागळे यांच्या सामाजिक ,राजकीय व इतर समाज कार्याची दखल घेत डीपीआय चे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे यांनी हातागळे यांची बीड जिल्ह्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली असल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून संत रविदास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या वतीने मदन हातागळे यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी लोकाशा पत्रकार तथा संत रविदास प्रतिष्ठान चे संस्थापक तुळशीराम वाघमारे ,मीडिया अध्यक्ष शेषेराव पोटे ,श्रीकृष्णा कावळे टेलर, राजाराम खंडागळे,महादेव वाघमारे,सुनील गोरे ,अमोल रोकडे,तुषार गांधले,रमेश गांधले,लखन रोकडे ,आकाश कांबळे यांच्या सह मित्र परिवार उपस्थित होते.