आणि करण ला बघून महेंद्रसिंह चंदेल यांचे डोळे पाणावले

34

🔸निस्वार्थ जण सेवा हीच खरी ईश्वर सेवा- निवृत्ती राठोड जिल्हा शल्य चिकित्सक

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपीपरी(दि.17मार्च):-मुलं म्हणजे देवाघरची फूल अशी म्हण प्रचलित आहे.मुल जन्मास येते तेव्हा तो क्षण अतिशय आनंदाचा असतो.त्यांच्या जन्मापासून तर वयात येईपर्यंत आई वडील वाटेल ते करतात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही याची पुरेपूर काळजी घेत असतात.अश्यातच मुलाला काही कमी जास्त झाल्यास आई वडील हवं ते करायला तयार असतात.असाच काहीसा प्रकार वढोली गावातील करण गोंगलेच्या बाबतीत घडल आहे.

करण संजय गोंगले या दहा वर्षीय मुलाला स्वादुपिंड अवयवाचा दुर्धर आजार जडला करणच्या उपचारासाठी वडिलांनी बहुतांश तज्ञ डॉक्टरांच्या दवाखान्याचे उंबरठे झिजवत फिरत राहिले.करणच्या आजरावर शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे आणि त्यासाठी तीन ते चार लाख रुपयांचा खर्च येईल असे डॉक्टरांनी सांगितले इतकी मोठी रक्कम आमच्या सारख्या दिन दुबळ्या माणसांनी आणायची कुठून या विचारात सर्व कुटुंब चिंतेत पडला होता.ही बाब प्रसार माध्यमांच्या लक्ष्यात आली आणि वृत्त प्रसारीत झाले.

संबंधित प्रकरण येथील प्रतिष्ठित नागरिक महेंद्रसिंह चंदेल यांच्या लक्षात येताच त्यांनी करण ला होइल तितक्या मदतीचा हात पुढे केला. प्रथमतः जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांच्या कार्यालयात जाऊन परस्पर संपर्क साधला.राठोड साहेबांनी करण चे रिपोर्ट्स बघितले आणि चंदेल यांना आपल्याकडून सर्वस्वी मदत करण्याचे आश्वासन दिले.चंदेल आणि राठोड साहेबांच्या
पाठपुरावा दरम्यान करण ला दिनांक ५/३/२०२१ ला नागपुर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये समोरील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

महेंद्रसिंग चंदेल यांनी आपल्या स्वखर्चाने करण आणि त्याच्या कुटुंबीयांना नागपुर येथे आणून स्वतः पुढाकार घेत सर्व प्रकरण हाताळत करण ला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल केला.त्यांच्या कुटुंबीयांना जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करून दिली.दाखल करताच करणवर तात्काळ उपचार सुरू झाले.काही दिवसातच करणच्या कुटुंबीयांनी चंदेल यांना फोन केला उपचार सुरळलित झाले,प्रकृती स्थिर आहे डॉक्टरांनी सुट्टी दिली आम्ही येत आहोत असे शब्द ऐकताच चंदेल यांचे डोळे आनंदाने भरून आले.

माझे शुल्लक प्रयत्न एखाद्याचे जीव वाचविण्यासाठी खर्च झाले याचा त्यांना आनंद वाटत आहे.त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही लगेच चंद्रपूरला जाऊन शल्य चिकित्सक यांची शुभेच्या भेट घेतली.त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल आभार मानले.साहेबांचे पुष्गुच्छ देऊन महेंद्रसिंह चंदेल यांनी सत्कार केला.निस्वार्थ जण सेवा हीच खरी ईश्वर सेवा असे वाक्य यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांच्या मुखातून बाहेर पडले.