शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा

34

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.19मार्च):-विद्यार्थी केंद्रित उपक्रम, गुणवत्ता, संशोधन आणि मुदतीत परीक्षा निकाल जाहीर करण्याची परंपरा जपत उच्च शिक्षणात वेगळेपण निर्माण केलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IIT-B), भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) व ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेकनिकल एज्युकेशन (AICTE) या राष्ट्रीय संस्थांमार्फत आयोजित केलेल्या मॅपाथोन (Mapathon) या मपिंगसाठीच्या स्पर्धेचा निकाल फेब्रुवारी मध्ये जाहीर करण्यात आला. या स्पर्धेसाठी देशभरातून वेगवेगळ्या संस्थांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. या स्पर्धेसाठी ५२२८ रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. यातून फक्त २५ स्पर्धकांची राष्ट्रीय मॅपाथोन चम्पिअन म्हणून निवड करण्यात आली.

या स्पर्धेसाठी भाग घेतलेल्या शिवाजी विद्यापीठातील भूगोल अधिविभागातील शिक्षक प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर, श्री. अभिजित पाटील, श्री. सुधीर पोवार तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांना Mapathon Champion या अवार्डने सन्मानित करण्यात
मॅपाथोन हि एक विशिष्ट स्थानबद्ध समस्येवर उपाययोजनेसाठी घेण्यात आलेली राष्ट्रीय स्थरावरील मॅपिंग स्पर्धा आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने संशोधनाकरिता भारतीय उपग्रहांनी घेतलेली माहिती, भुवन, NRSC, इ. प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध करून दिलेली आहे. या माहितीमध्ये भारतीय संसाधने, शेती, हवामान, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामीण व शहरी नियोजन आणि भविष्यातील विकासाचे मार्ग ओळखण्याची प्रचंड क्षमता आहे. आत्मनिर्भर भारत या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने सदर स्पर्धेसाठी फक्त भारतीय उपग्रहीय व अनुशांघिक माहितीचा वापर करणे अनिवार्य होते. यातून भारतीय अवकाश संशोधनाचे आत्मनिर्भर भारताकडे पडणारे आणखी एक पाऊल यातून स्पष्टपणे दिसून येते.

भारतीय रिमोट सेन्सिंग डेटाची क्षमता समजून घेणे आणि ओपन सोर्से सॉफ्टवेअरचा वापर करून भारतीय विभागांसाठी अत्याधुनिक नकाशे तयार करणे हे या स्पर्धेचे मुख्य उदिष्ट होते.
सदरच्या राष्ट्रीय मपिंग स्पर्धेसाठी प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर व त्यांच्या टीमने Flood Risk Assessment of Panchganga River आणि Landslide Risk Assessment of SW Maharashtra या विषय निवडले गेले. यातून त्यांनी कोल्हापूर व नजीकच्या परिसरातील स्थानिक भौगोलिक समस्या नकाशांमधून सादर केल्या.
कोल्हापूर शहरानजीक वाहणाऱ्या पंचगंगा नदीला येणाऱ्या पुराचा रिस्क झोन नकाशा उपग्रहीय माहिती व GIS सॉफ्टवेअरचा वापर करून तयार करण्यात आला. तसेच कोल्हापूर व सिंधुदुर जिल्ह्यादरम्यान असणाऱ्या पश्चिम घाटातील घाटरस्त्यांवर होणारे भूस्कलनही या नकाशांद्वारे डॉ. पन्हाळकर आणि त्यांच्या टीमने सादर केले.
या सदरच्या नकाशांसाठी प्रथमच भूगोल अधिविभागाने बारकोड प्रणालीचा उत्तम प्रकारे वापर केला गेला.

नकाशावरील बारकोड स्कॅन करताच मपमधील माहिती मोबाइलमध्ये असणार्या गुगलमॅप वरती दिसेल अशाप्रकारचे तंत्रज्ञान नकाशामधून सादर केले आहे. याचा वापर सदर भागातील लोकवस्ती व प्रशासकीय अधिकारी यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी होऊ शकतो.आता या मानांकनामुळे एक टप्पा आपण गाठला आहे. इथून पुढे हा दर्जा उंचावत नेण्याची जबाबदारी सर्वच संबंधित घटकांवर आहे. त्या जाणिवेतून या पुढील काळात काम होत राहणे आवश्‍यक आहे.

विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन संलग्नित महाविद्यालये सुद्धा आयएसओला सामोरे जाण्यासाठी सज्ज होतील.’
या अवार्डसाठी शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व मा. प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर, श्री. अभिजित पाटील, श्री. सुधीर पोवार व श्री. संजय शिंदे, यांचे अभिनंदन केले.विद्यापीठाची प्रगती ही सर्वांगीण दृष्टिकोनातून सुरू असल्याचे हे प्रमाणपत्रच आहे.विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या प्रत्येक घटकाचे हे यश असून, भविष्यातही विद्यापीठाची वाटचाल उत्तुंगतेकडेच राहील.