कोरोनाचे संकट : रक्ताचा तुटवडा, ‘विदर्भ ब्लड सेवा ग्रुप ब्रम्हपुरी ‘ रक्त संकलन संकल्प

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.19मार्च):- राज्यात कोरोनाचे संकट आहे. तर दुसरीकडे रक्ताचा तुटवडा आहे.राज्यात कोरोनाचे संकट आहे. तर दुसरीकडे रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे मयूर प्रदीप मेश्राम व प्रशांत दादा तालमले आणि सुधीर पिलारे, प्रफुल करंडे, युवराज करंडे त्रिदेव सेलोटे, ढोरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. विदर्भ रक्त सेवा ग्रुप ब्रम्हपुरी च्यावतीने रक्त संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतच चालला आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्णांची नोंद वाढत चाली आहे आहे. कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. कृपया गर्दी न करता रक्तदान करावे आणि रक्त संकलन करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन विदर्भ रक्त सेवा ग्रुप ब्रम्हपुरी अध्यक्ष प्रशांत तालमले व मयूर प्रदीप मेश्राम, प्रफुल करंडे यांनी केले आहे.सर्वांना आवाहन करण्यात येत की,येत्या काही दिवसात सर्व सामान्यांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे.लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेणे आवश्यक आहे.

आणि दुसरा डोस घेतल्या नंतर 28 दिवस रक्तदान करता येणार नाही. परिणामी उन्हाळ्यात रक्ताचा भयंकर तुटवडा भासू शकतो.त्यामुळे सर्व तरुण वर्ग आणि नागरिकांना आवाहन आहे की लसीकरण करण्याआधी आपण रक्तदान अवश्य करा.जेणेकरून रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे सुलभ होईल.विदर्भ ब्लड सेवा ब्रम्हपुरी प्रशांत दादा तालमाले, मयूर प्रदीप मेश्राम, युवराज करंडे, ओम सेलोटे, आशिष ढोरे त्रिदेव ठेंगरी प्रफुल दादा करंडे सुधीर पिलारे उपसरपंच ग्रामपंचात पारडगाव