हनेगाव येथे शाळा, कॉलेज, हॉटेल, बेकरी, बार, व आधी दुकाने बंद तर अनेकांकडून दंड वसूल

26

✒️हणेगाव प्रतिनिधी(महादेव उप्पे)

हणेगाव(दि.19मार्च):-नियम तोडणाऱ्याची गय केली जाणार नाही नियमानुसार गुन्हे दाखल होणार. ‌(आदित्य लोणीकर) हणेगाव (दि.१९). संपूर्ण जगामध्ये कोरोनाने कहर केला असून संपूर्ण मानव जातीला या भीतीच्या खाईत ढकलून देऊन सर्वांच्या छाताडावर नाचत असल्यामुळे संपूर्ण मानव जीवन संकटात सापडला आहे. भारतामध्ये याचा प्रादुर्भाव जास्त पसरला असून यामुळे सबंध भारतीय नागरिक हे संकटात सापडले असून यामुळे प्रत्येक लहानसहान गरजांची सुद्धा पूर्तता होत नसल्यामुळे आज प्रत्येक जण आर्थिक संकटात सापडला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य हे आघाडीवर असून कोरोनाची पहिली लाट संपते न संपते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांना पुन्हा मरणाच्या उंबरठ्यावर नेऊन उभा केला आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाची वाढती संख्या पाहता अनेक जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन चालू असल्यामुळे यामध्ये हॉटेल,बार, बेकरी,लग्न सभाग्रह गर्दीचे ठिकाण अशा अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात आले असून हाणेगाव हे देगलूर तालुक्यातील मोठे गाव असल्यामुळे येथे बाजारपेठ व या विभागातील जनतेची आवक-जावक जास्त असल्यामुळे या ठिकाणचे मरखेल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी चोख यंत्रणा राबविली असून त्यांच्याबरोबर मोहनराव कणकवले हणेगाव बिट जमादार व कर्मचारी पांढरे,जोगपेठे,चामलवाड यांनी अनेक विभागात कार्य करत आहेत.तरी जनतेने पोलीस प्रशासनाला व आरोग्य विभागाला सहकार्य करावे व प्रत्येकाने मास्क सॅनिटायझर वापरून एकमेकापासून अंतर ठेवून कोरोनाला हद्दपार करावे असे आदित्य लोणीकर यांनी जनतेला आवाहन करून सांगितले. यावेळी हॉटेल बार व इतर आस्थापने बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले.