चिमण्यांसाठी घरावर पाणी ठेवा- सामाजिक कार्यकर्ते संदिप घोरपडे

31

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.20मार्च):-माढा तालुक्यातील उपळवटे येथे उन्हाळ्याच्या झळा जाणवु लागल्याने पशु पक्षी यांची तहान भागवण्यासाठी उपळवटे गावातील सर्व ग्रामस्थांनी चिमण्यांसाठी घरावर पाणी ठेवा असा संदेश उपळवटे गावचे सामाजिक कार्यकर्ते संदिप घोरपडे यांनी यावेळी दिला दिवसेंदिवस ऊन वाढत चालले आहे पशु पक्षी अन्नासाठी वणवण करताना आपलेला दिसतात अन्न मिळवुन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत ते आपलेला दिसत असुन आपण आंधळ्या सारखे का वागतो आपलेला झोपेतून उठविण्यासाठी पक्षांची किलबिल रोज ऐकायला मिळते त्यांच्या जिव किती आहे.

जर त्यांना वेळेवर पाणी नाही मिळाले तर बिचारे ते मरुन जातील आपण एक मानुस कि धर्म जपण्याचं काम हे उन्हाळ्यातील चार महिन्यांत सर्वांनी केले पाहिजे अशी भावना पशु प्रेमी संदिप घोरपडे यांनी व्यक्त केली आयुष्यातील कोणतीही हाणी झाली तर आपण भरुन काढु शकतो पण पाण्यावाचून पशु पक्षांचा गेलेला जिव याची झालेली हाणी आपण कधीचं भरुन काढु शकणार नाही त्यामुळे तालुक्यातील सर्व जनतेने आमच्या या चांगल्या संदेश ची दखल घेऊन आज पासुनचं चिमण्यांसाठी घरावर पाणी ठेवण्यास सुरुवात करावी .