नेरी नवरगाव रस्त्यावर ट्रॅकटर च्या धडकेत एक दुचाकीस्वार जागेवरच ठार

27

🔺एक जखमी

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नेरी(दि.21मार्च):-नवरगाव मार्गावर नेरी येथील केवळराम कामडी यांच्या घरासमोर ट्रकटर आणि दुचाकी यांच्यात शनिवार दि 20 ला 5 वाजता जोरदार अपघात झाला ,यात ट्रेकटरने दुचाकीस्वाराला जागीच चिरडले यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर मागे बसलेल्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांला रूग्णालयात दाखल केले आहे.

सविस्तर असे मोटेगाव येथील गोकुलदास मेश्राम आणि दिवाकर दडमल हे दोघे जण आपल्या दुचाकी क्रमांक एम एच 34 बी क्यू 9778 ने नेरीला कामानिमित्त येत असताना बिना नंबरचे ट्रकटर ने केवळराम कामडी यांच्या घरासमोर जोरदार धडक दिली आणि यात दुचाकी स्वार गोकुलदास मेश्राम हे जागेवरच ठार झाले तर मागे बसलेले दिवाकर दडमल याना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलीस स्टेशन चे पी एस आय शेख आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले प्रताचे पंचनामा करून उत्तरनिय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असून पुढील तपास सुरू आहे