शासकीय कार्यालय आवारातील पाणपोई कोरड्याठाक, नगरपरिषद खुशाल,नागरीक बेहाल, जिल्हाधिका-यांना तक्रार:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

93

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

बीड(दि.21मार्च):-शहरातील शासकीय कार्यालय ऊदाहरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालय, सहदुय्यम निबंधक कार्यालय, तहसिल कार्यालय, अथवा बसस्थानक याठिकाणी बांधलेल्या पाणपोईचे खंडर झाले असून कित्येक महिने वापरात नसल्याने मोडकळीस आलेल्या आहेत, याप्रकरणात सध्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तिव्रता वाढल्याने त्या दुरूस्त करून पाण्याची सोय करण्यात यावी यासाठीच जिल्हाधिकारी तहसिलदार, सहदुय्यम निबंधक व आगारप्रमुख यांना लेखी निवेदन दिले आहे.

सविस्तर माहीतीस्तव :- बीड शहरातील नगररोडवरील शासकीय कार्यालयासमोर जसे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांसाठी असलेली राखीव जागेच्या ठिकाणी असलेल्या रांजणांची दुरावस्था असून काही रांजण फुटलेले तर काही रांजणात कपडे ठेवलेले आढळुन येतात, पिण्याच्या पाण्याचा पत्ताच नाही, याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहदुय्यम निबंधक कार्यालयात तीच अवस्था असून, तहसिल कार्यालय बीड आणि बीड शहर बसस्थानक परिसरातील पाणपोई बंद अवस्थेत आहे यामुळे नागरीकांच्या अडचणीत वाढत्या उन्हाळ्यात वाढ झालेली दिसुन येते.

जिल्हाधाकारी, तहसिलदार, आगारप्रमुख यांना लेखी तक्रार:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
_______________________________ बीड नगरपरिषद प्रशासन स्वच्छता आणि पिण्याचे पाणी या मुलभुत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थ असून कोट्यावधी रूपयांचा निधी घशात घालून डोळेझाक करीत आहेत, याविषयी वारंवार निवेदने, आंदोलनानंतर सुद्धा त्यांच्यात सुधारणा होत नाही, याप्रकरणात नगरविकास मंत्री, स्वच्छता पाणीपुरवठा मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड जिल्हाधिकारी, तहसिलदार,आगारप्रमुख यांना लेखी तक्रार करून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी यासाठी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड व शेख युनुस च-हाटकर, महंमद जुबेरखान बीडकर यांनी निवेदन दिले आहे.