निसर्ग वाचला तरच माणूस वाचेल : राजाभाऊ शिरगुप्पे

25

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.21मार्च):-निर्मिती प्रकाशन प्रकाशित प्रकाशनपुर्व काळातच पहिली आवृत्ती संपलेले नाटक म्हणुन प्रसिद्ध झोतात असलेले नाटकार चंद्रकांत सावंत लिखित सम्राट या नाट्य संहिता पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध लेखक व नाट्य समीक्षक राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या हस्ते प्रकाशन आज रविवार दि. 21 मार्च रोजी शाहु स्मारक भवन येथे पार पडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन बोलताना ते म्हणाले, विकासाच्या नावाखाली माणसाने आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु केला आहे. पण याचवेळी तो दुसऱ्या बाजुने निसर्गाचे अतोनात नुकसान करतोय. अशावेळी समाजाची जागृती होणे आवश्यक आहे. नेमके याचवेळी सम्राट हे नाटक प्रसिद्ध होत आहे. ज्यातून इथल्या व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घातले जाईल. निसर्गाचे संवर्धन होणे आवश्यक आहे. कारण, निसर्ग वाचला तरच माणुस वाचेल असा संदेश सम्राट या नाटकाने दिला आहे.

या प्रकाशन समारंभास जेष्ठ बालसाहित्यिक बाबुराव सिरसाट, सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते बसाप्पा आरबोळे, प्रा. करुणा मिणचेकर प्रमुख भाषणे झाली. सम्राट नाटकाच्या पहिल्या आवृत्तीचे 51,000/- मानधन लेखक चंद्रकांत सावंत यांनी या वेळी मान्यवरांच्या हस्ते धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टला दिले. प्रकाशनाला मोठ्या संख्येने नाटय प्रेमी उपस्थित होते. निर्मिती प्रकाशनचे प्रकाशक अनिल म्हमाने यांनी प्रास्ताविक केले तर निवेदन शांतीलाल कांबळे यांनी केले. आभार प्रसिद्ध कवी व लेखक मंदार पाटील यांनी मानले.

सदर बातमी प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही विनंती.