स्टोरी मिरर ने दिलेला हा सन्मान माझ्या साठी अभिमानाची गोष्ट आहे. – लेखिका संगीता देवकर

31

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.24मार्च):-साहित्य क्षेत्रात स्टोरी मिरर पोर्टल वरील सर्वांत मोठा साहित्य पुरस्कार म्हणून स्टोरी मिरर ऑथर ऑफ द इयर हा पुरस्कार गनल्या जातो .नुकताच ह्या पुरस्काराच्या मानकरी असलेल्या जेष्ठ साहित्यिका संगीता ताईने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.मी संगीता देवकर स्टोरी मिरर आणि त्यांच्या संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार मानते. स्टोरी मिरर जॉइन करून मला साधारण दोन वर्षे झाली असतील. मी कथा कविता आणि कोट्स इथे लिहीत गेले.

पण माझ्या लिखाणाचे कौतुक इतक्या कमी वेळात होईल आणि मला “ऑथर ऑफ द इयर 2020 “चा पुरस्कार मिळेल ही माझ्या साठी खूपच अनपेक्षित गोष्ट होती कारण इथे बरेच लेखक आहेत जे छान लिहितात. मला स्टोरी मिरर ने दिलेला हा सन्मान माझ्या साठी अभिमानाची गोष्ट आहे. अजून खूप छान लिखाण करायला मला प्रोत्साहन मिळाले आहे. आम्हा लेखकांना हा जो प्लॅटफॉर्म स्टोरी मिरर ने उपलब्ध करून दिला आहे तो खूपच उल्लेखनीय आहे. मला ही पुरस्काराची ट्रॉफी मिळाली याचा खूप आनंद वाटत आहे. आपल्याला लेखनाला अशी गोड दाद मिळणे म्हणजे स्वर्गीय सुखच! पुन्हा एकदा मी स्टोरी मिरर चे शतशः आभार मानते असे मत संगीता देवकर(प्रिंट &मीडिया रायटर. पुणे) यांनी व्यक्त केले