जिल्हाध्यक्ष शेख शफीक भाऊ सह एमआयएमच्या गुंड कार्यकर्त्यांवर 307 प्रमाणे गुन्हा दाखल करा

  48

  ?पठाण अमरजान यांची पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार

  ✒️बीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  बीड(दि.25मार्च):- एम आय एम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष शेख शफीक भाऊ सहा एम आय एम च्या गुंड कार्यकर्त्यांवर 307 प्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी तक्रार पठाण अमरजान यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात केली आहे.
  सविस्तर असे की ‘मी माझी नगरी साप्ताहिक वृत्तपत्राचा संपादक असून माझी नगरी या नावाने ऑनलाईन पोर्टल सुध्दा चालवितो. व मुक्त पत्रकार या नात्याने सोशल मिडियावर लेखन कार्य करत आसतो.जेकी आर्टीकल 19-1 ( A ) नुसार मला कायदयाने दिलेला अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा अधिकार आहे .
  मी मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार संदिप क्षीरसागर यांचा प्रचार केला होता व माझ्या वार्डात ( हत्तीखान , कागदीवेस ) येथे झालेल्या सभेत ऑल इंडिया इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे एम आय एम पक्षाच्या जातीवादी विचारसरणीच्या विरोधात मत व्यक्त केले होते.

  याचा राग धरुन मागील विधान सभा निवडणुकीत एम आय एम पक्षाचे उमेदवार राहिलेले व सध्या एम आय एम चे बीड जिल्हाध्यक्ष अॅड.शेख शफिक भाऊ व त्यांचा भाच्चा सय्यद सैफ अली ऊर्फ लालू यांनी मला त्यावेळी जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या व त्या नंतर 15 जुन 2020 रोजी माझ्या वृत्तपत्रात एक व्यंग चित्र प्रकाशीत झाले होत त्यावेळी सुध्दा ॲङ शेख शफिक भाऊ व त्यांचा भाच्चा सय्यद सैफ अली यांनी मला जिव मारण्याचे धमक्या दिले होते व पोलीस प्रशासनाचा धाक दाखवुन मला जाहिर माफ मागण्यास प्रवृत्त करत होते.

  हल्ली काही सामाजिक कार्यक्रमात मी ऑल इंडिया इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या जातीवादी विचारसरणीच्या विरोधात माझे विचार व्यक्त करत सोशल मिडियावरुन लेखन कार्य करत राहिलो तरी या सर्व बाबींचा राग धरुन दि .22 / 03 / 2021 रोजी संध्याकाळी 7.00 वा . एम आय एम च्या 20 ते 25 गुंड कार्यकर्त्यांनी हातात धारदार हत्यारे घेवुन माझ्यावर प्राणघातक हल्ला केला . तरी मी तेथून पळ काढली आणि धावत जवुन बीड नगर परीषदेच्या गाळयातील जन औषधी मेडिकल मध्ये आश्रेय घेतला.

  त्या ठिकाणी 1 ) सय्यद सैफ अली उर्फ लालू रा . चुन गल्ली मोठी राज गल्ली , बीड . वय वर्ष -28 2 ) शकिल खान तुराब खान रा . चुन गल्ली मोठी राज गल्ली , बीड . वय वर्ष -38 3 ) फारुक खान उर्फ भुऱ्या रा . रा . चुन गल्ली मोठी राज गल्ली , बीड . वय वर्ष -35 4 ) अडुल पुर्ण नाव माहित नाही वय वर्ष 25 रा . मसरत नगर बीड . व इतर दोन कार्यकर्त्यांना मेडिकल मध्ये घुसून मला लाथा , बुक्क्या ने बेदम मारहान केली व मला म्हणाले की तु जर एम आय एम पक्षाच्या विरोधात किंवा जिल्हाध्यक्ष अँड शेख शफिक भाऊ यांच्या विरोधात काही लिहालास किंवा काही बोललास तर तुला बशीरगंज चौकात कापून टाकेन व या नंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याने एम आय एम च्या गुंडाने तेथून पळ काढला . मी वरील आरोपींच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. माझ्या अर्जानुसार आरोपींवर 323,504,506 व 34 नुसार एन.सी.आर. दाखल करण्यात आली आहे.

  तरी मा. साहेबांना विनंती करण्यात येते की एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.शेख शफिक भाऊ व त्यांचा भाच्चा सय्यद सैफ अली उर्फ लालू , व वरील अरोपींनपासून माझ्या जिवितास धोका असून मा.साहेबांनी मला संरक्ष देवून माझ्या आर्जाला माझा जवाब समजून वरील अरोपींनवर 307 प्रमाणे फौजदार की गुन्हा दाखल करण्यात यावा.भविष्यात माझ्यावर काही प्राणघातक हल्ला झाला किंवा माझ्या सोबत काही दुर्घना घडली तर याची सर्वस्व जबाबदारी एम आय एम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड . शेख शफिक भाऊ व त्यांचा भाच्चा सय्यद सैफ अली उर्फ लानू सह वरील सर्व गुंड कार्यकर्ते जबाबदार राहील याची साहेबांनी दखल घ्यावी. अश्या आशयाची तक्रार पठाण अमरजान यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात देऊन त्याची एक एक प्रत माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेब व गृहमंत्री साहेबांना पाठविण्यात आली आहे.