उन्हाळ्यात पशू पक्ष्यांची विशेष काळजी घेतली जावी – प्राचार्य सांळुके

25

🔸औ.प्र. संस्थेत पक्ष्यांसाठी अन्न पाणी व्यवस्था

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.28मार्च):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पक्ष्यांच्या सोयीसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळ्यात वाढते उष्णतामान लक्षात घेता संस्थेतील पक्ष्यांच्या सोयीसाठी हा उपक्रम रासेयो च्या स्वयंसेवकांनी राबविलेला आहे. ह्या उपक्रमाचा शुभारंभ संस्थेतील नवनिर्मित बगीच्यात प्राचार्य संतोष सांळुके यांच्या हस्ते झाला.

याप्रसंगी त्यांनी स्वयंसेवकांच्या ह्या कृतीचे कौतुक केले आणि म्हणाले , पशू पक्षी हे राष्ट्रीय धन असून त्यांचे संवर्धन करण्याचे कार्य सातत्याने झाले पाहिजेत . उन्हाळ्याच्या काळात तर विशेष काळजी घेतली गेली पाहिजे असे ते म्हणाले . प्रास्तविक कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी निदेशक पुराम, खोडे, हलामी आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.