ऐन उन्हाळ्यात उपळवटे येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

✒️नागेश खूपसे (सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.28मार्च):-माढा तालुक्यातील उपळवटे येथे उपळवटे ग्रामपंचायतीने वडार वस्ती मध्ये मारलेले बोर पाच सहा महिन्यापासुन बंद होते नुकतेच उपळवटे ग्रामपंचायत सरपंच पदी नियुक्ती झालेले उपळवटे गावचे सरपंच बालाजी काका गरड पाटिल यांनी वडार वस्ती मधील जनता पाण्यासाठी ईकडे तिकडे धडपड करताना निदर्शनास आल्याबरोबर चं उपळवटे सरपंच बालाजी काका गरड पाटिल यांनी वडार समाजामधील लोकांना एकत्र बोलावून आपण पाण्यासाठी ईकडे तिकडे धडपड करण्याची काही गरज नाही.

आपल्या वडार वस्ती मध्ये ग्रामपंचायतीने मारलेले बोर कशा मुळे बंद आहे ते लवकरात लवकर चालु करुन देतो असे आश्वासन सरपंच बालाजी काका गरड पाटिल यांनी सांगितले आणी दोन चं दिवसांत पुर्ण पाठपुरावा करून तातडीने बोर चालु करुन घेतला त्यामुळे उपळवटे गावातील वडार वस्ती मधील लोकांनी सरपंच बालाजी काका गरड पाटिल यांचे आभार मानले वडार वस्ती मधील असो किंवा उपळवटे गावातील कोणतीही कामं असल्यास चोविसतास कधीही हि उपळवटे गावचा सरपंच या नात्याने आपली सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहिण असे सरपंच बालाजी काका गरड पाटिल यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित उपळवटे गावचे सामाजिक कार्यकर्ते संदिप घोरपडे,उपळवटे गावचे सरपंच बालाजी काका गरड पाटिल, लक्ष्मण मुरुमकर ,शहाजी आबा गरड, सागर सुकळे, सुनिल जाधव, बिभिषण जाधव हिरामण जाधव, हनुमंत जाधव, जोतीराम देवडकर ,आदी मान्यवर उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED