मौशी येथे वंचित बहुजन आघाडी मध्ये विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

64

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

नागभीड(दि.28मार्च):-वंचित बहुजन आघाडी तालुका नागभिड प. समिती क्षेत्र मौशी च्या वतीने बैठकीचे आयोजन कृषक विद्यालय मौशी इथे नागभिड तालुका निरीक्षक मा. सुखदेव प्रधान आणि डॉ प्रेमलाल मेश्राम यांच्या उपस्थित करण्यात आले. यामध्ये आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात विचार मंथन व नियोजन करण्यात आले. कांग्रेस , भाजप च्या कार्यावर अविश्वास ठेऊन वंचित बहुजन आघाडी हाच जन हिताचा एकमेव पक्ष ठरणार असा विश्वास ठेवून मौशी प. समिती क्षेत्रातील ईतर पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी तालुका पदाधिकारी व तालुका निरीक्षक यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
यामध्ये मा. वामनरावजी बुलबुले महाराज, मा. आनंदरावजी आडकीने, मा. रामचंद्रजी भोयर, मा. संदीप खोंडे, मा. मिथुन बनकर, मा. मारखंड मेश्राम, मा. अरुण गणवीर, मा. रमेश खोब्रागडे, मा. राजाभाऊ माटे, मा.सचिन मंडपे, मा. डांगे साहेब काहाली, मा. हिरामण मेश्राम,आदींनी पक्ष प्रवेश करून पक्षाची जबाबदारी स्वीकारली.

वंचित बहुजन आघाडी तालुका नागभिड तर्फे या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तालुका निरीक्षक सुखदेव प्रधान व जिल्हा सल्लागार dr प्रेमलाल मेश्राम तालुका अध्यक्ष मा. खेमदेव गेडाम, तालुका महासचिव शैलेंद्र बारसागडे, किशोर मेंढे, पुंढिलीक नाकतोडे, सुभाष रामटेके, चंद्रभान रामटेके कन्हाळगाव, काशिनाथ शामकूळे पाहारणी, वामन रामटेके, मिथुन बनकर, आनंदराव आडकीने, हिरामण मेश्राम, राजहंस बागडे, गंगाधर डांगे, गोपीचंद गणवीर, रमेश खोब्रागडे, सचिन मंडपे, राजेश्वर माटे, रामचंद्रजी भोयर, वामनराव बुलबुले महाराज, आदी अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.