दिव्यांग आरोग्य सहाय्यकास झाली मारहाण

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.30मार्च):-तालुक्यातील आरोग्य कार्यालयांमध्ये काम करणार्‍या दिव्यांग आरोग्य सहाय्यकास या कार्यालयांतर्गत काम करणाऱ्या डॉक्टर महिलेचे पतीने व ड्रायव्हरने त्याच्या हातातील काठी घेऊन मारहाण करून जखमी केले हे घटना 28 मार्च रोजी दुपारी दोन वाजता घडली असून फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड तालुका अरोग्या कार्यालयामध्ये भारत नरवाडे हा आरोग्य सहायक म्हणून काम करत असून २८मार्च रोजी रविवार असल्या मुळे तो घरी होता परंतु तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बिराजदार यांनी फोन करून ऑटीजेन टेस्ट किट देण्यास सांगीतले असता त्या वरून आरोग्य सहायक भारत संभाजी नरवाडे हे अँटीजेन किट डॉ. श्रीमती शिंदें यांना देण्यासाठी दुपारी २वाजता तालुका आरोग्य कार्यालय मध्ये आले.

कार्यालय उघडून बसले असताना डॉ. श्रीमती शिंदें यांचे पती व त्यांचा खाजगी चालक हे दोघेजण त्या ठिकाणी आले या ठिकाणी उपस्थित दोनी पायांनी दिव्यांग असलेला आरोग्य सहायक भारत नरवाडे यानी त्या दोघांना तोंडाला मास्क लाव असे म्हणताच त्यांनी भारत नरवाडे याला त्याच्याच हातातली काठी घेवुन त्याला मारहाण करून जखमी केले याप्रकरणी भारत नरवाडे यांच्या फिर्यादीवरून दोघा आरोपीवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुरन.१०७/२०कलम३५३,३३२,३३३,३२३,५०४,३४नुसार भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकाटे हे पाहत आहेत