नारायणगाव खेरवाडी ग्रामपंचायत च्या वतीने दिव्यांग व्यक्तींना 5 टक्के निधीचे वाटप

33

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

निफाड(दि.31मार्च):-तालुक्यातील नारायणगाव खेरवाडी येथे आज दिनांक 30- 3 -2021 रोजी खेरवाडी ग्रामपंचायत तर्फे ग्राम विकास अधिकारी दहिफळे साहेब सरपंच अश्विनीताई जाधव उपसरपंच विजय मामा लांडगे यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के निधीचे वाटप करण्यात आले.

दहिफळे भाऊसाहेबांच्या मोलाच्या सहकार्यामुळे कोरोना च्या काळात 21 दिव्यांगांना हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाल्यामुळे रुद्र अपंग संघटना नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष भारती संतोष लगड च्या वतीने. ग्रामसेवक दहिफळे साहेब.सरपंच अश्विनीताई दीपक जाधव .उपसरपंच विजू मामा लांडगे.व ग्रामपंचायत सदस्य उमेश पगारे व ज्येष्ठ नेते सोपानराव संगमनेरे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी यांचे मनापासून आभार मानले.

दिव्यांग व्यक्तींना निधीचे वाटप केल्याबद्दल ग्रामपालिका सरपंच सदस्य मंडळ यांचे कौतुक राष्ट्रीय विश्वगामी बहुउद्देशीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम साहेब व प्रदेश संघटक विजय भाऊ केदारे यांनी या उपक्रमाबाबत त्यांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले