✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605582830

चिमूर(दि.1मार्च):-गेल्या मागील काही महिन्यांपासून श्रावणबाळ योजनचे अनुदान थकबाकी असल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे . अनेक लाभार्थी प्रशासकीय कार्यालयत तसेच बॅंकेत चकरा मारीत आहे, मात्र रक्कम न आल्याने आल्या पावली त्यांना परत जावें लागत आहे. श्रावणबाळ योजनेचे अनुदान त्वरीत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे या करिता प्रहार सेवक,विनोद उमरे यांनी तहसिलदार साहेब यांना निवेदन दिले.

यावेळी तहसिलदार नागटीळक साहेब यांनी सोमवार पर्यंत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात येईल असे प्रहार सेवक यांना आश्वासन दिले.त्यावेळी प्रहार सेवक मुरलीधर रामटेके, प्रहार सेवक आदीत्य कडू, प्रहार सेवक स्वप्नील खोब्रागडे, प्रहार सेवक सचिन घानोडे, प्रहार सेवक नारायणन निखाडे, प्रहार सेवक प्रशांत कडवे उपस्थित होते

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED