प्रहार दिव्यांग संघटना नांदेड शाखा कुंटूर च्या वतीने स्व.गंगाधररावजी कुंटूरकर यांना श्रध्दांजली अर्पण

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

कुंटूर(दि.६एप्रिल):-महाराष्ट्राच्या राजकारणातील मुरब्बी नेता अशी ख्याती असलेल्या व कुंटूर च्या सरपंच पदापासून ते पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आमदार, खासदार, पाटबंधारे राज्य मंत्री, साखर संम्राट,शिक्षण संम्राट पर्यंतचा खरतड प्रवास करणारे कै.गंगाधरराव मोहनराव देशमुख कुंटूरकर यांना प्रहार दिव्यांग संघटना कुंटूर च्या वतीने सानेगुरुजी वाचनालयात एका मीनीटाचे मौन पाळून व त्यांच्या आठवनींना उजाळा देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या वेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे नांदेड जिल्हा सहसचिव चांदू आंबटवाड, कुंटूर शाखा प्रमुख जावेद सत्तार चाऊस,मल्हारी महादाळे, वामनराव पा.चिंताके, गोविंद होळकर, तुळशीराम कदम, पिराबाई वाघमारे, देऊबाई देवदे ईत्यादी हजर होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED