दिव्यांग आरोग्य साहायकास मारहाण प्रकरणी तलाठी गजानन रामचंद्र शिंदे निलंबित

37

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(खे.10एप्रिल):-तालुक्यातील आरोग्य कार्यालयांमध्ये काम करणार्‍या दिव्यांग आरोग्य सहाय्यकास या कार्यालयांतर्गत काम करणाऱ्या डॉक्टर महिलेचे पतीने व ड्रायव्हरने त्याच्या हातातील काठी घेऊन मारहाण करून जखमी केले प्रकरणी तलाठी सजा रुमना जवळा प्रतिनियुक्ती तलाठी सजा रणीसावरगांव व हरंगुळ तहसील कार्यालय गंगाखेड श्री गजानन रामचंद्र शिंदे यांना शासकीय कर्मचाऱ्यास अशोभनीय ठरेल अशी क्रती केली असून तसेच भाग ०१महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे नियम ०३ मधील भंग केला आहे त्या मुळे त्यांना शाशन सेवेतून निलबित करण्यात आले आहे असे आदेश उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंड अधिकारी गंगाखेड यांनी दिनांक ०८/०४/२०२१रोजी निलंबित चे आदेश काडले आहे ही घटना 28 मार्च रोजी दुपारी दोन वाजता घडली असून फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अपंग कर्मचारी यांच्याद्वारे माननीय जिल्हाधिकारी परभणी तथा दिव्यांग सल्लागार शासकीय समिती जिल्हा परभणी यांना दिव्यांग वृद्ध आरोग्य सायकास मारहाणप्रकरणी आरोपीविरुद्ध योग्य उचित कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते सदर निवेदन दिनांक ०७/०४/२०२१ रोजी देण्यात आले होते संघटनेचे राज्य अध्यक्ष साईनाथ पवार साहेब राज्य उपाध्यक्ष अशोक आठवले उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष महादेव शिंदे सदस्य शंकर साबळे