सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील व ग्रा.पं. सदस्य रूपाताई पाटील यांच्या स्वखर्चातून आठ हाय मास्टचे भूमिपूजन

24

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

खेरवाडी(दि.13एप्रिल):-तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे सामाजिक कार्यकर्ते श्री विलास पाटील व ग्रामपंचायत सदस्य सौ. रूपाताई विलास पाटील यांच्या स्वखर्चातून 8 हायमास्टचे भूमिपूजन नववर्षानिमित्त पाचही वार्ड मध्ये आज श्री विलास पाटील व ग्रामस्थांच्या हस्ते संपन्न झाले*.

निवडणुका आल्या की प्रत्येक उमेदवाराचे एक ब्रीद वाक्य असते एकच ध्यास, गावचा विकास व जय-पराजयानंतर पराभूत व निवडून आले उमेदवार आपला नारा विसरतात परंतु या समाजात असेही उमेदवार आहे की जे एका वार्डात निवडून येऊन विरोधात असतांनाही आपल्या वार्ड पुरते मर्यादित न राहता संबंध गावचा विचार करून सर्व वॉर्डाचा सर्वांगिन विकास हाच ध्यास व हा नारा प्रत्यक्षात आणणारे सामाजिक कार्यकर्ते श्री.विलास पाटील यांच्या रूपाने गावास बघावयास मिळाले ते त्यांच्या निस्वार्थी आमदार-खासदारांना ही लाजवेल अशा कामामुळे. त्यांनी यापूर्वी ही 5 लाख रुपये स्मशानभूमी कामासाठी मंजूर करून आणले आहे व थोड्याच दिवसात विविध मूलभूत विकास कामांची गंगा ते या खेरवाडी नगरी करता आणणार आहे. त्यांचा आदर्श सर्वग्रामपंचायत सदस्यांनी घ्यावा ही ग्रामस्थांची माफक अपेक्षा.आज वार्ड क्रमांक 1 ते 5 मध्ये भूमिपूजन संपन्न झाले.

वार्ड क्र. 2 हायमास्ट भूमिपूजन प्रसंगी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य रूपाताई पाटील, अँड. संदीप पवार, प्रतिभाताई संगमनेरे, कैलासराव संगमनेरे, अनिल संगमनेरे रतन बांडे, ग्रामस्थ भाजप उपाध्यक्ष योगिता आवारे, मा.सरपंच चिंधू गांगुर्डे, अरुण संगमनेरे, काशेश्वर संगमनेरे,योगेश जाधव,दिनकर संगमनेरे,रमेश संगमनेरे, उत्तम संगमनेरे,भारत संगमनेरे, सतिश संगमनेरे , किरण संगमनेरे , केरू संगमनेरे, संजय संगमनेरे, गणपत संगमनेरे,दीपक संगमनेरे, जिवा संगमनेरे, दादा शेलार,संतोष संगमनेरे, अक्षय संगमनेरे शिवाजी संगमनेरे,रजनीकांत संगमनेरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते*.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेंद्र आहेर यांनी केले*.