म्हसवड येथे विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

30

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.15एप्रिल):-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतिनिमित्त म्हसवड शहरात विविध ठिकाणी शासनाने आखून दिलेल्या नियमावलीसह “सोशल डिस्टन्सीग”चे पालन करत बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून अभिवादन करणेत आले.म्हसवड शहरातील आंबेडकर नगर येथे सकाळी नऊ वाजता म्हसवड पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करणेत आले.बुद्धविहारात बौद्धाचार्य कुमार सरतापे यांनी बुद्ध वंदना घेतली यानंतर लहान मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी महिला,लहान मुले आणि बौद्ध बांधव उपस्थित होते.

दुपारी दोन वाजता जयंतीनिमित्त “रक्तदान शिबिर” घेणेत आले त्यास मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी आंबेडकरप्रेमींनी मोठ्याप्रमाणात रक्तदान करून समाजापुढे बाबासाहेबांच्यावरील प्रेम आणि आदर्श निर्माण केला.सिद्धार्थनगर(सरतापे वस्ती)येथे बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करणेत आले. यावेळी अध्यक्ष साहिल सरतापे,खजिनदार उत्तम सरतापे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव सरतापे,मनोज सरतापे,पत्रकार एल.के.सरतापे,केशव सरतापे,भाजपा एस.सी.सेलचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सचिन लोखंडे,भाजपा व्यापारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष परेशव्होरा,आर.पी.आय.माण तालुका उपाध्यक्ष महेश लोखंडे,भारतीय बौद्ध महासभा माण तालुका सचिव सचिन सरतापे आणि बौद्ध समाजातील महिला आणि पुरुषांची व लहान मुलांची उपस्थिती होती.

महात्मा फुले चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणेत आले यावेळी मुबईचे आयकर आयुक्त नितीन वाघमोडे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. यावेळी कॉग्रेसचे पदाधिकारी विशवंभर बाबर,अनिल लोखंडे,नगरसेवक विकास गोंजारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर विविध पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.