घरी कापड विक्री करणाऱ्या दुकानदारसह ग्राहकांवर नगरपरीषद व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या केली दंडात्मक कारवाई

26

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.16एप्रिल):-शहरातील श्रीचंद क्लार्थ स्टोअर्सचे मालक कपडा व्यवसायिक आज कडक लॉकडाऊन असतांना देखील सिंधी कॉलनी येथे आपल्या घरी कापड विक्री करीत होते.याच दरम्यान गस्तीवर असलेल्या नगरपरीषद व महसूल विभागाच्या पथकाला यांची माहिती मिळताच उपविभागिय अधिकारी चंद्रभान खंडाईत, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी अनिल जगताप यांच्या उपस्थितीत पथकाने धाड टाकली असता याठिकाणी कापड व्यवसायिक ग्राहकांना कापड विक्री करताना आढळून आला.यावेळी या कापड विक्री करणाऱ्या दुकानदार १० हजार रुपये दंड थोटावण्यात आला.

तर येथे उपस्थित १२ ग्राहक बिना मास्कने आढळल्याने त्यांच्यावर सुरू दंडात्मक कारवाई करण्यात आली.हि कारवाई उपविभागिय अधिकारी चंद्रभान खंडाईत,नगरपरीषदेचे मुख्याधिकारी अनिल जगताप यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात नगरपरीबषेदेचे कोरोना पथक प्रमुख सुरेश आडेपवार अनिल झाडे ,विशाल ब्राम्हणक ,रऊफ खाॅॅन ,सुरेश आडेपवार महेन्र्द नक्के ,किशोर कुमरे ,बालु गेडाम,पिन्टु वकील होमगार्ड अक्षय दाते , महसूल विभागाचे मंडल अधिकारी हेमने मसाळे , पटवारी वाटोरे यांनी केली आहे.