वंशाचा दिवा लावायला कोणी शिल्लक राहणार नाही. पँथर डॉ. राजन माकणीकर

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.18एप्रिल):-विश्वभूषण बाबासाहेब डॉ. भीमराव सुभेदार रामजी आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माता आहेत, त्यामुळे मनूच्या पिलावळीने अवकातीत राहावे अन्यथा तुमचा वंशच दिसणार नाही. असा गंभीर इशारा पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे दिला.

ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे ७० वर्ष होऊन गेले देश गुण्या गोविंदाने नांदत आहे. तुझ्या सारख्या नाजाईज मनुच्या पिलाला जन्म देणाऱ्या आईला सर्वार्थाने मान-सन्मान व संरक्षण मिळाले आहे, त्या महापुरुषांबद्दल अपशब्द बोलून देशातील एकता व राष्ट्राची एकात्मता भंग करू पाहणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीनि याद राखा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरच नव्हे, अन्य कुन्याही महामानवांच्या व्यक्तिमत्वावर चिखलफेक केली तर… वंशाला दिवा लावायला कोणी शिल्लक राहाणार नाही अशी गंभीर प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केली.

उत्तर प्रदेशात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्राला १४ एप्रिल रोजी फाडून जाळनाऱ्या राष्ट्रवादी पार्टी ऑफ इंडियाच्या मनुवादी औलादीचा अध्यक्ष जयप्रकाश मिश्रा सारख्या हरामखोराला आंबेडकरी अनुयायांनी चांगलाच चोप देऊन तोंडाला काळे फासून गाढवावर वरात काढायला पाहिजे असा सल्लाही डॉ. माकणीकर यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंध भारतीयांनी वाचावा म्हणजे असे गैरकृत्य हातून घडणार नाही, त्यासाठी भारत सरकारने डॉ. आंबेडकर सह भारतीय संविधान शालेय शिक्षणातून शिकवणे गरजेचे आहे असेही डॉ. माकणीकर म्हणाले.

उत्तर प्रदेश सरकारने लवकरात लवकर मिश्रा वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक शासन व यासारख्या प्रवृत्तींना आळा नाही घातल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक टी एम कांबळे गट पक्ष प्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात यूपीत येऊन पँथर स्टाईल प्रतिउतर देईल याला सर्वस्वी जवाबदार योगी सरकार राहील असाही इशारा पक्षाच्या वतीने डॉ. माकणीकर यांनी दिला.

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED