बळसाणे गावात ‘डॉक्टर आपल्या दारी’ या अभियानातून कोरोनाचा पायबंद

35

🔹कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आदर्श उपक्रम

✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

धुळे(दि.21एप्रिल):-बळसाणे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉक्टर आपल्या दारी’ या अभियानाची संकल्पना राबविण्यात आली. अभियानात आरोग्य पथकाच्या माध्यमातून नागरिकांची थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिजन पातळीची तपासणी करण्यात आली. याचबरोबर गरजू व्यक्तींना औषधांचे हे वाटप करण्यात आले. यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टर, आशा सेविका सरपंच दरबारसिंग गिरासे उपसरपंच महावीर जैन व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.*_

बळसाणे गावात कमी प्रमाणात कोव्हिड १९ चे रुग्ण आढळले आहेत. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमातून गावातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी डॉ किरण वाघ व त्यांच्या पथकातील सदस्य करत आहेत. आर्थिक परिस्थिती गरिबीची असणारे गावात अनेक कुटुंब आहेत. या कुटुंबातील सदस्य आजारपण जरी आले तरी पैशांच्या अभावी उपचार करण्यास टाळाटाळ करतात तसेच दुखणे अंगावर काढतात. अशा नागरिकांना कोरोना ची लागण होऊ नये तसेच त्यांच्यामुळे कोरोना चा प्रसार होऊ नये म्हणून प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्याचे ठरविण्यात आले. ही संकल्पना उपसरपंच महावीर जैन यांच्या माध्यमातून मांडण्यात आली. गावात सर्दी, ताप व खोकल्याचे रुग्ण आढळल्यानंतर त्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच रुग्णांना ग्रामपंचायतच्यावतीने विनामूल्य औषध आशा सेविका व प्राथमिक शाळेचे शिक्षक यांच्या मार्फत वाटप करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासे, उपसरपंच महावीर जैन, ग्रा.प.सदस्य सुदाम खांडेकर, देविदास धनुरे, प्रा भुषण हालोरे, बापू माळचे, रावसाहेब हालोरे आदी उपस्थित होते. डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.

*गरीब नागरिकांची मोफत तपासणी व औषधोपचार*

कोरोना चा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण असा डॉक्टर आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला. यामुळे ज्या नागरिकांची आर्थिक स्थिती बेताची होती अशा नागरिकांचीही मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. याचबरोबर ज्या नागरिकांना इतर त्रास होता त्यांच्यावर औषधोपचार ही करता आले. कोरोना चा अधिक शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे

*लक्षणे जाणवल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा*

नागरिकांचा आरोग्य सर्वे करत असताना किंवा झाल्यानंतर कोणालाही काही लक्षणे दिसल्यास त्यांनी तात्काळ गावातील आरोग्य उपकेंद्रात जाऊन तपासणी करावी. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा असे आवाहन ग्रामपंचायत उपसरपंच महाविर जैन यांच्या वतीने करण्यात आले.