आंनद सागर विसावा येथील कोविड सेंन्टर मध्ये मुदतबाहय औषध रुग्णाला वितरित

31

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

शेगाव(दि.22एप्रिल):-कोरोनामुळे सर्व राज्यात हाहाकार माजलेला असतांना महाराष्ट्र शासना मार्फत देखरेखी खालील कोविड सेन्टर शेगांव येथे आरोग्य सुविधेचा दुर्लक्षितपणा पुन्हा एकदा उघडीस आला असून नर्स कडुन चक्क मुदत बाहय औषधी गोळया कोरोना पाॅझीटिव्ह रुग्णास दिल्याची घटना आंनद सागर विसावा येथील कोविड सेन्टर मध्ये घडली दरम्यान सदर बाब रुग्णाने डाॅक्टर यांच्या लक्षात आणुन दिल्यानंतर वैघकिय अधिकारी यांनी मुदत बाहय औषधी गोळया परत घेवुन रुग्णास नविन गोळया दिल्या सदर रुगणाच्या हा प्रकार लक्षात आल्यामुळे योग्य झाले नाही तर कोरोनाच्या काळात मुदत बाहय औषधी घेतली गेली असती तर त्यामुळे होणारे साईट ईफेक्ट रुग्णाला भोगावे लागले असते तरी मुदय बाहय औषधी देणार्‍या नर्स वर कारवाही करावी तसेच मुदत बाहय औषधी पुरवठा करणार्‍या अधिकारी यांच्यावर सुध्दा कारवाही करावी अशी मागणी रुग्णाकडुन करण्यात येत आहे

“आंनद सागर येथील कोविड सेन्टर येथे मि उपचार घेत अंसताना पाच दिवसानंतर गोळया संपल्यानंतर पुन्हा मला जेव्हा गोळया दिल्या त्या मुदत बाहय होत्या. सदर प्रकार माझ्या लक्षात आल्यामुळे मि डाॅक्टर यांना हा प्रकार लक्षात आणुन दिल्यानंतर माझ्याकडुन मुदत बाहय गोळया जमा करुन नविन गोळया देण्यात आल्या”
अंबादास पवार( रुग्ण) माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष