शासनाने लवकरात लवकर शिक्षक भरती काढावी – शुभम बेद्रे

31

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.23एप्रिल):- शासनाने डी.एड, बी.एड झालेल्या तरुणांची भविष्य विचारात घेऊन लवकरात लवकर शिक्षक भरती काढावी. महाराष्ट्रामध्ये डी.एड, बी.एड झालेले लाखोच्या स्वरूपात विद्यार्थी आहेत, त्यांना कुठलाही रोजगार नाही. त्यांना रोजगार मिळवण्यासाठी खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. टीईटी झालेले हजारो उमेदवार बेरोजगार राहिलेले आहेत, पण त्यांनी टीईटी देऊन त्यांचा काय फायदा झाला. असा सवाल शेतकरी संघटनेचे उपजिल्हाप्रमुख शुभम बेंद्रे यांच्यासमोर उभा राहिलेला आहे. जर शासन दहा दहा वर्षे शिक्षक भरती काढत नसेल, तर विद्यार्थ्यांनी डी.एड बी.एड करायचं कशासाठी त्याचा काय फायदा होतो, हे शासनाने गांभीर्यपूर्वक लक्षात घेऊन विचार करावा.

जे विद्यार्थी डी.एड बी.एड करतात ते विद्यार्थी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बेरोजगार म्हणून आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. जर आपण शिक्षक भरती काढली तर तेच बेरोजगार तरुण नवीन जीवन जगून नव्या आशेने पुन्हा जोमाने कार्य करू लागतात. शिक्षक भरती होत नसल्यामुळे खूप काही कॉलेजेस सुद्धा बंद पडले आहेत. याचा विचार शिक्षण विभागाने करून टीईटी पात्र झालेल्या सर्व उमेदवारांची लवकरात लवकर भरती करून त्या विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा प्राप्त करून द्यावी. असे मत रयत शेतकरी संघटनेचे उपजिल्हाप्रमुख शुभम बेद्रे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.