मदर तेरेसा संस्थेच्या वतीने कोविड सेंटरला 50 हजारांची औषधे मोफत

✒️विशेष प्रतिनिधी(अतुल उनवणे)मो:-9881292081

नेवासा(दि.27एप्रिल):-येथील ज्ञानमाऊली चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश राऊत यांच्या पुढाकाराने मदर तेरेसा सोशल वेलफेअर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भेंडा येथील कोविड सेंटरच्या रुग्णांसाठी पन्नास हजाराची औषधे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.कोविड सेंटर सुरू झाल्यानंतर मदतीचा ओघ येथे सुरूच आहे.

३०० बेडची सुविधा असलेल्या या सेंटरच्या मदतीसाठी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केलेल्या आवाहनानंतर त्या आवाहनाला प्रतिसाद देत नेवासा येथील ज्ञानमाऊली चर्चचे धर्मगुरू फादर प्रकाश राऊत यांनी मदर तेरेजा सोशल वेलफेअर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कोविड रुग्णांना उपयोगी असलेले फैबी प्लू ची ८०० व ४०० ची को पॅक औषधे तहसीलदार यांच्याकडे फादर प्रकाश राऊत यांनी सुपूर्त केली.

यावेळी जळके खुर्द येथील सरपंच अँड.राजेंद्र पंडित, पत्रकार सुधीर चव्हाण उपस्थित होते. आमच्या संस्थेच्या वतीने रुग्णांची गरज ओळखून अजून ही मदत वस्तूच्या रूपाने देण्याचा आम्ही कोविड सेंटरला देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी फादर प्रकाश राऊत यांनी बोलताना दिली.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED