केज शहरातील सुरू असलेल्या मुख्य रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम त्वरित थांबवून कंत्राट मिळालेल्या कंपनीवर तात्काळ कारवाई करा– निलेश भैय्या साखरे

29

🔹अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार- वंचित बहुजन आघाडी केज

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी,बीड जिल्हा)मो- 8080942185

केज(दि.29एप्रिल):-केज शहरातील सुरू असलेल्या मुख्य रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पुढे तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचे बेड काही दिवसांत खराब होऊन वागणार्या वाहणधारकाना त्रास दायक ठरणार आहे.

तरी या चौकातून पुढे सर्व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील नागरिकांची ये-जा होत असते याचं मुख्य चौकात जर अशा निकृष्ट दर्जाचे काम होत असेल तर भविष्यात नागरिकांना पुन्हा हेच हाल सहन करावे लागतील तरी संबंधित प्रशासनाला आदेश देऊन मा.तहसिलदार साहेब केज यांनी संबंधित कंत्राट असलेल्या एच पी एम कंपनिला आदेश देऊन बोगस कामे बंद करून कंपनिवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

सदरील निकृष्ट दर्जाचे होत असलेले कामे तात्काळ थांबवण्यात दिरंगाई झाली तर तिव्र आंदोलन छेडू असे वंचित बहुजन युवा आघाडी केज तालुका यांच्या वतीने दि-29 एप्रिल2021रोजी केज तहसिल यांना निवेदन देण्यात आले‌ तरी यावेळी वंचित बहुजन आघाडी चे बीड जिल्हा युवा कार्यकारिणी सदस्य निलेश भैय्या साखरे, वंचित बहुजन आघाडी केज तालुका सचिव उत्तम वाघमारे,गणेश लांडगे,विजय अंडिल व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.