पुसद तालुक्यात कोरोणा रूग्णाची वाढती संख्या लक्षात घेत गावं तिथे कोविड सेंटर तात्काळ सुरू करा -डॉ.आरतीताई फुपाटे

30

✒️यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.1मे):- सध्या शहरात व तालुक्यात कोराेना माहामरीने कहर केला असुन.कोरोना बाधित रुग्णांवर प्रथम अवस्थेत उपचार करणे गरजेचे असुन.तालुक्यातील आठ जिल्ह्य परीषद सर्कल मधील प्रत्येक गावातील नागरिकांना कोरोनाचे लक्षणॆ न व्हाव या हेतुने त्या,त्या गावपातळीवर व त्या जागेवरच चाचणी करून औषध उपचार केल्यास प्रथम अवस्थेत रुग्ण लवकर बरा होवु शकतो. हे आता सर्वानाच समजले आहे.

गावातील प्रतिष्ठीत लोकांनी, तरुण, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मतभेद बाजूला ठेऊन मानवजातीच्या कल्याणासाठी एकत्रितपणे एकत्र येणे हि काळाची गरज आहे, या कोरोना महामारीच्या काळात लढा दिला तर आपण जगु या नाहीतर मानवाच्या जिवणाचा नाश होण्यासाठी क्षण हि कॉफी आहे तर या गोष्टी सर्वानी मनावर घेतल्यास सहजपणे करू शकतो.

सध्या तालुक्यात टाळेबंदी सुरू असल्या मुळे काही नागरिकांचे रोजगार गेले आहे माहगाईमुळे सर्व नागरिक त्रस्त झाले असून मागील दिड वर्षापासून आधिच सर्व नागरिक मेटाकुटीला आले आहे. त्यातच राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे कोणत्याही प्रकारच्या सुख सुविधा सरकार नागरीकांना पुरविण्यात असमर्थ ठरत आहे.याच सरकारने मोठ मोठ्या घोषणा केल्या परंतु त्यांचा नागरिकांना आजपर्यंत कुठलाही प्रकांरचा फायदा देंखील झालेला नाही.

त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाच्या देखभालीसाठी गावातील, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर, नर्स, मलेरिया वर्कर तसेच गावात एक जबाबदार शासकीय डाॅक्टर यांची नेमणूक करून त्या डाॅक्टरांनी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा गावात भेट देऊन रुग्णाची परिस्थिती कशी आहे, याबाबत मार्गदर्शन करून औषध उपचार करावा तसेच देखरेख ठेवण्यासाठी व अडीअडचणी करीता व सोडवण्यासाठी गावातील ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत शिपाई, कोतवाल, यांना शासकीय आदेश दिले तर काम फार सोपे होईल, असे केल्याने तालुक्यांतील जिल्हा परिषद मधिल प्रत्येक गावातील परिस्थितीत लवकरात लवकर सुधारणा होऊ शकते, असे माजी जिल्हा परिषद सदस्य व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ महासचिव डॉ. सौ.आरतीताई फुपाटे यांनी म्हटले आहे.