श्रमिक चळवळ व स्वतंत्र राज्य सत्याग्रह

27

(जागतिक मे दिन विशेष)

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. दि.१ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात. विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. तर दि.१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात आज रोजी मेपोल हा काठी महोत्सवसुद्धा साजरा होत असतो.दि.२१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती.

सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटनजवळ जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झा़ले. तेव्हा पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांचे बलिदान व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन दि.१ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.

त्यानंतर इ.स.१९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन अर्थात मे दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिवस आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशीच असतो. चेन्नईतल्या मरीना किनाऱ्यावर ‘श्रमाचा विजय समूहशिल्प’ हा दिवस शिकागोमध्ये दि.४ मे १८८६ मध्ये घडलेल्या हेमार्केट घटनेच्या स्मरणार्थ जगभरातील समाजवादी, साम्यवादी आणि अराजकतावादी पक्ष साजरा करतात.
सध्याचा ‘मे दिन’ हा १९व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरु झाला. ज्याची मुख्य मागणी आठ तासाच्या कामाच्या दिवसाची होती.

या संदर्भातील पहिली मागणी दि.२१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून करण्यात आली. तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला. ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजकतावादी संघटनांनी दि.१ मे १८८६ रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरु केली. अशाच एका मोर्चाला पांगवताना दि.४ मे १८८६ रोजी शिकागोमध्ये सहा आंदोलन कर्त्यांचा मृत्यू झाला. याची परिणती पोलिसांच्या क्रूरतेविरुद्ध एका मोठ्या निषेधात झाली. त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला, ज्यात ८ पोलिसांचा मृत्यू आणि ५० पोलीस जखमी झाले. या घटनेच्या स्मरणार्थ दि.१ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने सन १९८९च्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅॅरीस परिषदेत केली.त्या परिषदेत दि.१ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. इ.स.१८९१च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिकरित्या प्रतिवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे मे दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

✒️संकलक व लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
मु. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकाजवळ,
रामनगर वॉ.नं.२०, गडचिरोली. व्हा.नं. ७४१४९८३३३९.