पोलिसांच्या मनावरील ताण हलका करण्यासाठी राबवला अनोखा उपक्रम

29

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.6मे):-कोरोना महामारीच्या काळात शासनाने लॉक डाउन जाहीर करून कडक निर्बंध जाहीर केले आहेत. अमल बजावणी देखरेखीसाठी पोलीस दल चोवीस तास तैनात करण्यात आले आहे.स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सर्वच पोलीस आपले कर्तव्य चोक बजावत आहेत. जागरण करून पहारा करत आहेत. साहजिकच सर्व प्रकारच्या गोष्टींचा ताण पोलिसांच्या मनावर पडत आहे.पोलिसांना तणाव मुक्त करण्यासाठी व उत्साही रहाण्यासाठी राज्य राखीव पोलीस बल गट क्र १६ मार्फत अनोखे सैनिक संमेलन पिरवाडी ता करवीर येथील मुख्यालयाच्या दरबार हॉल ला भरवण्यात आले.यावेळी जवळजवळ 100 हून अधिक पोलीस उपस्थित होते.

कार्यक्रमाचे *प्रास्ताविक* व *सूत्र* *संचालन* सुरेश राठोड, समन्वयक सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यांनी केले.
पहिल्या सत्रात प्रजापिता ईश्वरीय विश्वविध्यालयाच्या स्नातक व आध्यात्मिक गुरू राजेश्वरी शिंदे यांनी पोलीस मित्रांना *स्व* ची *जाणीव* करून दिली. कर्तव्य बजावत असताना येणाऱ्या आव्हानांना कसे परतवून लावायचे हे समर्पक उदाहरणांवरून समजावून सांगितले. आपल्यातील *पोलीस* *मामा* सदैव जागृत ठेवूया असे आवाहनही त्यांनी केले.मनावर येणाऱ्या ताण तणावामुळे व्यक्तींना अनेक प्रकारची व्यसने लागतात. ती किती घातक ठरू शकतात व व्यसनमुक्त जीवन कसे जगावे हे म.गांधी व्यसनमुक्ती राज्य पुरस्कार प्राप्त अध्यापक एकनाथ चंदर कुंभार यांनी स्पष्ट केले.

त्यावेळी अनेक चित्रे दाखवत मनोरंजक हालचाली घेऊन सर्वच उपस्थितांच्या मनावरील ताण हलका केला. यावेळी सर्वांची आजीवन *व्यसनमुक्त* *जीवनाची* *शपथ* घेण्यात आली.पोलिसांना पण मन आहे. त्यांच्यात पण अनेक सुप्त गुण आहेत. त्यांना वाव मिळावा म्हणून छोटा *सांस्कृतीक* *कार्यक्रम* ठेवण्यात आला होता. विनोदी चुटके सांगत संकल्प विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रकाश सुतार यांनी सर्वांना हसवले व मंत्रमुग्ध केले. या सत्रात *कोल्हापूर* *गितमंचचे* आर.ए. कांबळे, डी. एस. कौशल, संतोष ठाकर, अमर चोपडे, सहदेव कांबळे यांनी अनेक देश भक्तीपर गीतांचे गायन करून पोलीस मित्रांच्या मनात स्फूर्ती जागृत केली.

कार्यक्रमाचे *संपूर्ण* *आयोजन* मुख्यालय प्रमुख डी वाय एस पी शिवाजीराव जमदाडे यांनी केले. यावेळी राज्य राखीव पोलीस दलाचे सर्व पदाधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. श्री जमदाडे यांनी आपल्या जीवनातील अनेक अनुभव सांगत करर्तव्याबरोबरच आपल्या कुटुंबाला पण वेळ दया. त्यांची आस्थेने चौकशी करा, आईवडीलांची सेवा करा असे भावनिक आवाहन त्यांनी केले व आभार प्रदर्शन केले.