प्रलंबित धुळे जिल्हा पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील ८ व नंदुरबार जिल्ह्यातील १४ सहकारी उपसा योजना पुन्हा कार्यान्वित करा – संदिप दादा बेडसे

25

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)

शिंदखेडा(दि.6मे):-तालुक्यातील ३६ गावांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ‘सहकारी उपसा सिंचन योजना. मागील अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या उपसासिंचन योजना पुन्हा सुरू करण्याबाबत हजारो लाभार्थी शेतकऱ्यांची ईच्छा पूर्ण झाल्यास शिंदखेडा तालुक्यातील ३६ गावातल्या हजारो हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना दुष्काळाचा करावा लागणारा सामना संपुष्टात येईल या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय संदिप दादा बेडसे यांनी वरील विषयाकरीता राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री सन्माननीय ना. जयंतरावजी पाटील साहेब यांच्याशी भेट घेऊन शिंदखेडा मतदारसंघातील ८ व नंदुरबार जिल्ह्यातील१४ सहकारी उपसा सिंचन योजना चालू करण्याचे साकडे घातले आहे..

यामुळे प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमधील ९०.५० दलघमी पाण्यामुळे शिंदखेडा मतदारसंघातील ८ उपसा सिंचन योजनेअंतर्गत २६ गावातील ३१५७ लाभार्थी शेतकरी बांधवांचे ५२२३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील१४ उपसा सिंचन योजनेअंतर्गत ३३ गावातील हजारो लाभार्थी शेतकरी बांधवांचे ९१९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे..

यामुळे शेतकऱ्यांना बारामाही पिके घेण्यास व दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी बळ मिळेल व शेतकरी राजा सुखी होईल.संदिप दादा बेडसे यांच्या भेटीनंतर व निवेदनानंतर आदरणीय मंत्री महोदयांनी जलसंपदा आणि पाटबांधारे विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यापर्यंत बैठक घेऊन सदरील प्रलंबित समस्या प्राधान्याने सोडवण्याचे संदिप दादा बेडसे यांना आश्वासन दिले.