दोंडाईचा पोलीसांच्या कामगिरीत आणखी एक तुरा-बेकायदेशीररित्या जाणारी तीन लाखाची देशी विदेशी दारू पकडली

63

🔸मिळालेल्या टिपच्या आधारे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी तासभराच्या आतच लावला छडा

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.6मे):-लाँकडाऊन काळात दोंडाईचा शहरातुन बेकायदेशीररित्या तीन लाखाची देशी विदेशी दारू व बियरची बेकायदेशीर वाहतूक व विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांना खबऱ्यामार्फत मिळताच,तासभराच्या आत छडा लावत अँपेरिक्षा वाहनासह माल पोलीसांनी ताब्यात घेतला. म्हणून काल पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्याची घटना उलटत नाही तोच बेकायदेशीर रित्या गावातून जाणारी तीन लाखाची दारू पकडून पोलीसांच्या कामगिरीत आणखी एक तुरा रोवला गेल्याचे जनतेमध्ये बोलले जात आहे. एकूणच पोलीसांच्या कामगिरीवर जनता खुश असल्याचे चित्र गावात पाहावयास मिळत आहे.

घटनेबाबत दोंडाईचा पोलीसांनी दिलेली माहिती अशी की-आज दिनांक ५/०५/२०२१ रोजी दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांच्या आदेशाने सहाय्यक निरीक्षक संतोष तुकाराम लोले,पोलीस उप-निरीक्षक देविदास पाटील, पोलीस नाईक मुकेश आहिरे, संदीप उल्हास कदम असे देशात करोना विषाणू ह्या संसर्गजन्य रोगाचे प्रादुर्भाव होवू नये म्हणून लाँकडाऊन करण्यात आल्याने दुपारी ११.००.वाजेपर्यंत शहरातील सर्व आस्थापने बंद करण्याबाबत राज्य शासनाचे आदेश असल्याने वरील नमुद कर्मचारी सरकारी वाहन क्रमांक MH-18-BR-5426 हिच्याने दोंडाईचा शहरात पेट्रोलिंग करित असताना दोंडाईचा शहराच्या मोनाली चौफुलीवर येऊन चौफुलीवर असलेल्या आस्थापना भंगार गोडावुन बंद करत असताना पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा मार्फत टिप मिळाली की,अँपेरिक्षा क्रमांक MH-BH-0541 हिच्यात देशी विदेशी दारू व बियरची अवैध वाहतूक करून विक्रीसाठी बाहेरगावी दोंडाईचा बायपासने चिमठाण्याकडे घेऊन जात आहे.

अशी टिप मिळाल्याने त्यांनी आम्हा वाहनावरिल सर्व अधिकारी व कर्मचारी अशांना मोनाली चौफुलीवर दोंडाईचा शहरात तसेच बायपास रोडने येणारी सर्व वाहने तपासणी करणे बाबत आदेशित केल्याने आम्ही सर्व वाहने तपासणी करित असताना दुपारी १२.१० वाजेच्या सुमारास एक अँपेरिक्षा बायपास रोडवरून मांडळ चौफुलीकडे येताना दिसली.सदर अँपेरिक्षास थांबण्याचा इशारा केल्याने सदर रिक्षावरील चालकाने रिक्षा रोडच्या बाजूस घेऊन थांबवली. सदर रिक्षा क्रमांक पाहता MH-18-BH-0541 असे असल्याचे दिसुन आले.सदर रिक्षा चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सचीन गोकुळ परदेशी वय-२८ वर्ष राहणार चिमठाणे शिवाजी चौक ता.शिंदखेडा जि.धुळे सांगितले. सदर इसमास त्याचे ताबे उपभोगातील रिक्षामध्ये काय आहे बाबत विचारपुस केली असता उडवा उडवीची उत्तरे देत होता.

यावेळी त्याची रिक्षाची झडती घेतली असता त्यात टुर्बो बियरचे ६५० एम एलच्या बारा बाँटल× आठ खोके प्रति १७० प्रमाणे १६३२०/ रू.माल,राँयल स्टाँग क़ंपनीची व्हिस्की ९० एम.एल.१००बाँटल ९०/रू.प्रति प्रमाणे एकूण ९०००/ रू.माल, टँंगो कंपनीची देशी दारू १८०एम.एलच्या ४८×३ खोके एकूण ७४८८/रू.माल, मँकडाँल कंपनीचे १८० एम.एलचे.९६ बाँटल×१६०/रू प्रति प्रमाणे एकुण १५३६०/रू.माल, आँफीसर्स ब्ल्यु कंपनीचे १८० एम.एल.चे ३ खोके एकुण २०१६०/रू.माल,दोन लाख रू अँपेरिक्षाची किमंत असा एकुण दोन लाख अडुसष्ट हजार तीनशे अठ्ठावीस रूपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक श्री योगेश सुरेश पाटील यांनी फिर्याद दिली असुन डॉयव्हरला पुढील तपासकामी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सध्या गावात मागील लाँकडाऊन पासुन पोलीस कस्टडीतील कै.मोहन मराठे प्रकरण व नुकतेच काही दिवसापूर्वी मुलीच्या छेडखानीवरून दोंडाईचा पोलीस स्टेशनवर चालून आलेला जमाव व त्यात अल्पसंख्याक व्यक्तीचा झालेला खुन यामुळे जनसामान्यात पोलीसांविषयी न्याय मागण्याची विश्वासहर्ता कमी झाली होती. मात्र दोंडाईचा पोलीस स्टेशनला काही दिवसापुर्वी नव्यानेच लाभलेले पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी चांगली कामगिरी करत. काल अल्पवयीन मुलीला पळवून नेलेल्या आरोपीला दोन दिवसात शोधत ,मुलीला तिच्या आई-वडिलांना सुपुर्द केले.त्यात आज दुसऱ्याच दिवशी गावातुन तीन लाखाची बेकायदेशीर वाहतुक व विक्रीसाठी जाणारी देशी विदेशी दारु व बियर पकडून अवैध वाहतुक धंद्यावर चाफ बसविल्याने ,सहाजिकच त्यांच्या ह्या कामगिरीचे गावात कौतुक केले जात आहे.