गंगाखेड (परभणी) मध्ये नारायण सेवा संस्थान,शाखा गंगाखेड़ च्या माध्यमातून कोरोना रुग्णास व परिवारास मोफत भोजन व औषधी व्यवस्था उपक्रम सुरू

34

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7मे):-नारायण सेवा संस्थान उदयपुर मधे मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या एकमेकास साह्य करू उपक्रमा प्रमाने शाखा गंगाखेड (परभणी) येथेही एकमेकास सहाय्य करू अभियान सुरू करण्यात आले. *गंगाखेड उपविभागीय अधिकारी मा.सुधीरजी पाटील यांच्या मार्गदर्शना अंतर्गत आणि नारायण सेवा संस्थान शाखा गंगाखेड़ संयोजिका सौ.मंजू दर्डा यांच्या अथक प्रयत्नाने कोरोना संक्रमित कुटुंबियांना मोफत भोजन सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.*
या उपक्रमात, कोरोना संक्रमनात विलगिकरण झालेल्या कुटुंबातील सर्व सदस्याना मोफत शुद्ध सात्विक भोजन दिले जाईल.कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे कुटुंबिय सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत आणि दुपारी 1 ते 3 या वेळेत जेवण बुक करू शकतात.*

*✳️अन्न शुद्ध,सात्विक आणि शाकाहारी असेल.*
*✳️भोजन व्यवस्था मोफत आणि घरपोच होईल.*
*✳️सर्व धर्म समभाव प्रमाणे ही व्यवस्था गंगाखेडमध्ये राहणाऱ्या कोणत्याही जातीच्या,कुटुंबांसाठी असेल.*
*✳️आपल्या नावाचा मोबाइल नंबर आणि अ‍ॅड्रेस कॉल करून कळवावे लागेल*.
*✳️कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट खाली दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपवर अत्यावश्यक आहे.*

यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला संस्थेच्या हेल्पलाइन क्रमांकावर *9649499999* व *कोरोना पेशंट चा पॉज़िटिव रिपोर्ट पाठवावा लागेल.*

तसेच एकमेकास सहाय्य करू या योजनेंतर्गत *गंगाखेड* मधे कोरोना संक्रमित झालेल्या पेशेंट ला *मोफत औषधी किट वाटप करण्यात येणार आहेत.*
ज्यात,
💊इव्हर्मेक्टिन 12 मी
💊डॉक्सी 100 मी
💊झिंक व्हिटॅमिन सी
💊व्हिटॅमिन डी 3
💊मल्टीविटामिन
💊पॅरासिटामोल 500 मिलीग्राम
💊अझिथ्रोमाइसिन 500 मिलीग्राम
🧴1ML सॅनिटायझर पाउच- 5
Gloves – 1 जोडी
😷Mask 3ply – 1
वरील औषधे उपलब्ध असतील.

*मोफत औषधे मिळविण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असेल.*

*विनामूल्य औषधे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी नि: शुल्क व्हॉट्सअ‍ॅपवर 9649499999 वर संपर्क साधा.*

*कोरोना पेंशट ने व होम क्वारेन्टाईन परिवाराने या सेवेचा लाभ घेऊन आम्हाला उपकृत करावे असे आवाहन नारायण सेवा संस्थान, गंगाखेड शाखाअध्यक्षा सौ.मंजू दर्डा यांनी केले आहे*