पुरोगामी संदेशच्या बातमीचा इम्पॅक्ट-किशोर सोनवणे यांच्या मागणीला यश

26

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)

मोबा.9075686100

म्हसवड(दि.7मे):- शहरात प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी 3 मेपासून कडक लॉक डाऊन जाहीर केला त्यामध्ये सर्व बँकांचा समावेश केल्यामुळे रुगणाच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत होती उपचाराला लागणाऱ्या पैशासाठी वणवण फिरावे लागते होते त्यामुळे आर पी आय नेते किशोर सोनवणे यांनी शहरातील बँका चालू करण्याची मागणी केली त्यामागणीला प्राधान्य देत आज सकाळी 8 ते 11 वाजेपर्यत सर्व बँका चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली.

म्हसवड शहरात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे प्रांताधिकारी यांनी 3 मे पासून 10 मे पर्यत शहरात कडक लॉकडाऊन जाहीर केला होता त्यामध्ये शहरातील अत्यावश्यक सेवेतील हॉस्पिटल,दवाखाने,मेडिकल वगळता सर्व दुकाने आणि बॅँका बंद ठेवण्याचे आदेश देणेत आले होते.
बँका बंद असल्यामुळे बँकाचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे बंद होते शेतकरी आणि रुगणाच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती पैशे असूनही खात्यावरून पैसे काढता येत नव्हते शेतीसाठी आणि रुग्नासाठी लागणारी ओषधे घेता येत नसल्याने शेतीचे तर नुकसान होत होते त्यापेक्षा जास्त रुगणाच्या नातेवाईकांचे हाल जास्त होत होते.

या कारणाने शहरातील नागरिकांनी आर पी आय नेते किशोर सोनवणे याच्यापुढे आपली कैफियत मांडली आणि त्यांनी आश्वासन दिले आणि पाठपुरावा करून बँका सुरु करण्याची विनंती केली.पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले आणि आज सकाळी 8 ते 11 वाजेपर्यत बँका चालू ठेवण्यास परवानगी मिळाली आणि नागरिकांची अडचण दूर झाली.बँका चालू झाल्यामुळे शहरातील नागरिकांनी पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क आणि किशोर सोनवणे याचे आभार मानले आणि धन्यवाद दिले.