खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन प्रकल्प उभारणीसाठी बिनव्याजी कर्ज द्या

36

🔹खासदार बाळू धानोरकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.8मे):- कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात जगभर कहर करीत आहे. पहिल्या लाटेनंतर सुस्त असलेली यंत्रणा दुसऱ्या लाटेच्या सामना करण्यास कमी पडली आहे. त्यामुळे येत्या काळात तिसऱ्या लाटेचे संकेत तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. आता तिसऱ्या लाटेची वाट न बघता सर्व शासकीय रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन काढणारा प्रकल्प सुरु करणे तसेच सर्व खासगी रुग्णालयांना शासनाने बिनव्याजी कर्ज ऑक्सिजन प्रकल्प उभारणी करिता द्यावा तसेच तिसरी लाट ग्रामीण भागात पोहचेल, तेव्हा जिल्ह्यात नियंत्रण कक्ष उभा करावी. अशा लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना केल्या आहेत.

आजच्या घडीला रुग्णाचा जीव वाचविणे महत्वाचे आहे. त्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे. रॉ मटेरियल उपलब्ध नाही असे नाही. निसर्गातच ऑक्सीजन उपलब्ध आहे. हवेतून ऑक्सिजन वेगळा करता येतो. त्यात तंत्रज्ञान आहे. सर्व शासकीय रुग्णालयात प्लांट लागायला हवे होते. परंतु कुठेच काही झाले नाही. डिसेंबर, जानेवारी तर कोरोना गेला म्हणून निर्बंध शिथिल केले. तज्ज्ञांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. कोणतेही नियोजन केंद्र शासनाने केले नाही. महाराष्ट्रात हजारो लोकांचे जीव ऑक्सिजन अभावी जात आहे. पहिली लाट आली तेव्हा आपण सारेच नवे होतो.

तेव्हाच्या चुका समजू शकतो. परंतु दुसरी लाट येणार असा इशारा जगभरातील तज्ज्ञ देत होते. त्याकडे दुर्लक्ष केले. आपल्याला भरपूर बेडची आवश्यकता लागणार हे ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्येच समजले होते. परंतु त्याचे कोणतेही नियोजन केले नाही त्यामुळे येत्या काळात तिसऱ्या लाटेचे संकेत तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. त्यामुळे सर्व शासकीय रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन काढणारा प्रकल्प सुरु करणे तसेच सर्व खासगी रुग्णालयांना शासनाने बिनव्याजी कर्ज ऑक्सिजन प्रकल्प उभारणी करिता द्यावे तसेच तिसरी लाट ग्रामीण भागात पोहचेल, तेव्हा जिल्ह्यात नियंत्रण कक्ष उभी करावा. अशा लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना केल्या आहे.