ज्येष्ठ पत्रकार एस.आर.कोसे यांचे निधन

40

✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागभीड(दि.9मे):- साप्ताहिक नागभीड सेवक चे संपादक शिवाजीराव कोसे यांचे दिनांक 8 मे रोजी रात्री 10.15 वाजता दुःखद निधन झाले. कोसे गुरुजी यांनी कांग्रेस पक्षाचे शेवटच्या क्षणा पर्यंत काम केले. गेल्या 30 वर्षांपासून त्यांचे साप्ताहिक नागभीड सेवक हे नियमित सुरू आहे. नागभीड सेवक पासून पत्रकारिता सुरु करून आज अनेक पत्रकार अनेक दैनिक/प्रसार माध्यमात काम करीत आहेत.
—-
” नागभीड सेवक चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार एस आर कोसे यांच्या निधनाची बातमी आमच्यासाठी दुःखद आहे, 1993- 94 मध्ये माझ्या पहिल्या बातम्या नागभीड सेवक मधून प्रकाशित झाल्या, एकुणच माझ्या पत्रकारितेचा प्रारंभ नागभीड सेवक मधून झाला, अनेक बातम्या बाबतीत कोसे गुरुजी यांनी त्यावेळी मार्गदर्शन केले आहे.

दरम्यानच्या काळात आमच्या बातम्या व लेख विविध वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यानंतर त्यांचे फोन यायचे,
वृद्धापकाळाने नागभीड सेवक ची जबाबदारी त्यांनी त्यांचे सुपुत्र अशोक यांचेकडे सोपवली होती, मात्र त्यांचे पूर्ण लक्ष असायचे, आम्ही नेहमीच अशोकराव यांचेकडे गुरुजी यांच्या तब्बेतीच्या बाबतीत माहिती घेत होतो.कोसे गुरुजी यांच्या निधनाने एक ज्येष्ठ व अनुभवी मार्गदर्शक पत्रकार आज आमच्यात नसल्याची जाणीव नेहमीच होणार आहे.त्यांना पुरोगामी संदेशच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे”
– सुरेश डांगे (संपादक- साप्ताहिक पुरोगामी संदेश)