अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवाना धारक महासंघाच्या शहराध्यक्षपदी अनिल जाधव हरंगुळकर तर कार्याध्यक्षपदी राजेश कांबळे

28

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.9मे):-येथे अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवाना धारक महासंघाच्या शहराध्यक्षपदी अनिल जाधव हरंगुळकर यांची तर कार्याध्यक्षपदी राजेश कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

आज गंगाखेड शहरातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्या उपस्थितीत अखिल महाराष्ट्र राज्य दुकानदार परवाना धारक महासंघाच्या शहराध्यक्षपदी अनिल जाधव हरंगुळकर यांची निवड करण्यात येवुन पुढील कार्य) कारिणी घोषित करण्यात आली.

यामध्ये कार्याध्यक्ष राजेश कांबळे, उपाध्यक्ष लक्षणलक्षण मुंढे, सचिव सचिन भालेराव, कोषाध्यक्ष अनुप असावा प्रसिद्धी प्रमुख विशाल साळवे तर सल्लागार म्हणून नरहरी पेकम,राध्येश्यामजी बंग, किशोर शिंदे (मामा) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.