महाराष्ट्र माथाडी व गुमस्था कामगार युनियन वतिने श्रीकांतभाऊ दारोळे यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती

32

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.१०मे):- महाराष्ट्र माथाडी व गुमस्था कामगार युनियन वतिने मा. श्रीकांतभाऊ दारोळे यांनी शासन दरबारी कामगार संदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केलेल्या प्रश्न संदर्भात जाहीर पाठिंबा देण्यात आला व श्रीकांतभाऊ दारोळे यांची युनियनच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
लाँकडाऊन काळामध्ये परवानगी दिलेल्या उद्योग /आस्थापना मधील सर्व कामगारांचा कोविड विमा उतरवणे बंधनकारक करण्यात यावा व जे उद्योग /आस्थापना लाँकडाऊन काळामध्ये पण सुरू आहेत परंतु कामगारांना कोविड विमा उपलब्ध करून देण्यात आलेले नाही अशा सर्व उद्योग /आस्थापना तात्काळ बंद करण्यात याव्यात.

या मागणीसाठी महाराष्ट्र माथाडी व गुमस्था कामगार युनियनच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. संबंधित प्रश्न गंभीर असून भविष्यात जर शासनाने आपल्या SOP मध्ये कामगारांचा विमा बंधनकारक केला नाही तर आंदोलनात्मक भुमिका संघटणेच्या वतीने घेण्यात येणार आहे अशी भूमिका युनियनचे महाराष्ट्र संस्थापक, सरचिटणीस मा. श्री.अंकुशराव पाचांगणे साहेब यांनी व्यक्त केली.

तसेच मा. श्रीकांतभाऊ दारोळे यांची सामाजिक व कामगार क्षेत्रातील तळमळीने करत असलेल्या कार्याची दखल घेऊन सर्वानुमते युनियनच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचे सांगण्यात आले भविष्यात पदाला न्याय देऊन युनियनचे मोठ्या प्रमाणावर संगठन व कामगारांचे प्रश्न ताकतीने सोडवाल या अपेक्षा सह पद नियुक्ती बद्दल अभिनंदन व पुढिलवाटचाली करीता हार्दिक शुभेच्छा देण्यात आली.