दोंडाईच्यातून फोन वर केले स्ट्रिंग ऑफरेशन -नाशिक शहरातील रेमडीसिवर काळाबाजार उघड

28

🔸दिग्विजयसिंग राजपुत यांचे कौतुकास्पद कामगिरी

✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

शिंदखेडा(दि.10मे):-तालुक्यातील दोंडाईचा शहरातूनच फोन वर नाशिक शहरातील रेमडीसिवर इंजेक्शनाचा काळाबाजार मनसे विध्यार्थ्यी सेनेचे शिंदखेडा तालुका संघटक दिग्विजयसिंग राजपुत व त्यांचे सहकारींनी जनतेसमोर उघड केलेला आहे नाशिक शहरातील दोन संशयित रेमडीसिवर इंजेक्शन चढ्या भावाने विकतात अशी माहिती शहादा तालुक्यातील सावळदा येथील सुमीत गिरासे यांना मिळाली त्यांनी लगेच मनसे विध्यार्थ्यी सेनेचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष दिग्विजयसिंग राजपुत यांना सांगितले त्यानंतर दिग्विजयसिंग राजपुत यांनी सदरील रेमडीसिवर विकणारा व्यक्तीला फोन केला असता त्यांनी एक रेमडीसिवर २४ हजाराला तर दोन रेमडीसिवर इंजेक्शन ४८ हजाराला मिळेल असे सांगितले.

त्यानंतर दिग्विजयसिंग राजपुत यांनी राजपुताना फांऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष गिरीशसिंग परदेशी यांना संपूर्ण प्रकार सांगितला परदेशी यांनी नाशिक येथील त्यांचे सहकारी वैभव देशमुख यांचा नंबर राजपुत यांना दिल्यानंतर राजपुत ने संपूर्ण प्रकार वैभव देशमुख यांना सांगितले त्यानंतर यांनी स्ट्रिंग ऑफरेशन करून यांचा काळाबाजार उघड करू असे ठरविले नंतर राजपुत यांनी सदरील संशयितांना फोन केला त्यांना सांगितले की मी धुळ्याला आहे माझा मित्र नाशिक येथे राहतो मी त्याला पैसे घेऊन राणेनगर येथील बोगद्याजवळ पाठवितो त्याच्या कडे देऊन द्या त्यानंतर देशमुख यांनी अंबड पोलीसांना पूर्वकल्पना दिली होती त्यानुसार पोलीसांनी सापळा रचला (एमएच ०२,एवाय ५१३७) या होंडा सिटी कारमध्ये दोन युवक राणेनगर बोगद्याजवळ आले.

आणि त्यांनी देशमुख यांना रेमडीसिवर देऊ केले तेवढ्यातच पोलिसांनी (रा.विनयनगर,इंदिरानगर) येथील अमोल रमेश देसाई व (असावरी चेंबर्स,कॉलेज रोड) येथील निलेश सुरेश धामणे या दोघ संशयितांना ताब्यात घेतले त्यांच्या कडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा सिटी कारसह इंजेक्शन व काही रोक रकम असा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरिक्षक सुरेश देशमुख यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात अत्यावश्यक सेवा वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयितांना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश शेवाळे हे करत आहेत