डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेबद्दल अवमानकारक भाषा वापरणाऱ्यास तात्काळ कारवाई करावी-वंचित बहुजन आघाडी

32

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड,)मोबा.9075686100

सातारा(दि.13मे):-आसरे’ ता वाई’जि. सातारा येथील युवक योगेश दिलीप खोपडे याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जे अवमानकारक विधान केले आहे . यासाठी त्याचा निषेध करून त्यावर कारवाई व्हावी यासाठी दहिवडी ता. माण येथे पोलिस स्टेशन दहिवडी येथे या ठिकाणी संबधीत युवकावर गून्हा दाखल करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी माण यांच्या वतीने करण्याात आली.

यावेळी सहा.पोलीस निरीक्षक भुजबळ यांना निवेदन देताना उपस्थित युवराज भोसले .(अध्यक्ष माण )बजरंग वाघमारे (सचिव) सनी तुपे युवा नेते संतोष घाडगे (कोषाध्यक्ष) बापूराव शिंदे बादल शिंदे गणेश नवघन पत्रकार रवी जगताप सनी देव खरात ( आर .पी.आय गट) तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपास्थित होते.