ग्रामीण रुग्णालय-विवेकानंद कोविड सेंटर,हिवरा आश्रम येथे शिवसेना आणि युवासेवा यांच्याकडुन मदत

62

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.13मे):- कोरोनाच्या काळामध्ये सातत्याने सक्रियतेने व दूरदृष्टि ठेऊन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपले लोकप्रतिनिधी संजय रायमुलकर व युवासेना काम करताना दिसत आहे.आज हिवरा आश्रम मधील ग्रामीण रुग्णालयाला आश्वासित 100 बेड पैकी एका आठवड्याच्या आत 50 बेड देण्यात आले व उर्वरित बेड लवकरात लवकर पोच केल्या जातील.आपल्या सेवेत लवकर ग्रामीण रुग्णालय रुजू होण्यासाठी तयार होत आहे.

तसेच विवेकानंद आश्रम संचालित विवेकानंद कोविड सेंटर मध्ये असलेले रुग्ण हे लवकरात लवकर बरे व्हावे.त्यांना पोषक नाश्ता व आहार मिळावा.लोकप्रतिनिधी संजय रायमुलकर यांच्या तर्फे शारंगधर अर्बन क्रेडिट सो.संचालक तथा युवासेना प्रमुख निरज रायमुलकर भेट देऊन 50000 रुपये रोख रक्कम देऊ केली.आतपर्यत विवेकानंद कोविड सेंटरला 1 लाख रुपये मदतनिधी देण्यात आला.

या दोन्ही ठिकाणी मदत देताना विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे सर,सहसचिव आत्मानंद थोरहाते सर,विश्वत पुरुषोत्तम आकोटकर,ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख आलिम,डॉ.निलेश निकस,डॉ.मयुर निकस,डॉ.धाड़कर,डॉ.शिवानी मिटकरी,डॉ.पल्लवी कुल्हाळे शिवसेना शाखा प्रमुख विठ्ठल भाकडे,गणेश बेंडमाळी,पवन शेळके,अंगरक्षक रामा अत्तरकर,सामाजिक कार्यकर्ते अभिषेक आकोटकर,कैलास कुसळकर,गणेश धंदर,आशिष सावते इ.बांधव उपस्थित होते.

आपल्या मतदारसंघातील जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा नेहमी घडत राहो तसेच या परिस्थितित जास्तीत जास्त सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे,असे आ.संजय रायमुलकर म्हणाले.