वैनगंगा नदीवरील पुलाचे कटरे मोडकळीला: दुरुस्तीची मागणी

27

🔸चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.13मे):-कोणत्याही पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा संभाव्य धोका उद्भभवू नये म्हणून काळजी घेतली जाते यासाठी शासनाकडून पुलीयाचे बांधकाम पूर्ण करते वेळीच प्रवाशांसाठी उपाययोजना म्हणून पुली याच्या दोन्ही बाजूला कटरे लावणे अनिवार्य केले जाते मात्र ब्रह्मपुरी- आरमोरी राज्य महामार्गावर वैनगंगा नदीवर असलेल्या पुलीयावरील कटरे अध्येमध्ये मोडकळीस आलेले आहेत त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता अपघाताची भीती होण्याची शक्यता सदर पुलाच्या स्थितीवरून स्पष्ट दिसून येत आहे.वैनगंगा नदीवर गेल्या पाच सहा दशक आगोदर हा पूल बांधण्यात आला त्यानंतर त्याची दोन वर्षानंतर डागडुजी करण्यात आली.

मात्र ऑगस्ट महिन्यात गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे या पुलावर असलेले दोन्ही बाजूचे कटरे मोठ्या प्रमाणात मोडल्याने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना आता भिती वाटायला लागली आहे महत्वाचे म्हणजे या मागणी संदर्भात बरेचसे पत्र व्यवहार सुद्धा करण्यात आले मात्र सदर मागणीकडे केराची टोपली दाखवितानाअक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप बऱ्याच प्रवाशांकडून होत आहे.या ठिकाणापासून ब्रह्मपुरी शहर वीस किलोमीटर अंतरावर आहे तर आरमोरी शहर अवघे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे.

त्यामुळे गांगलवाडी हळदा मुडझा आवळगाव बरडकिन्ही रूई निलज पाचगाव तसेच इतर गावातील शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थीतसेच नागरिक बाजारपेठ इतर मार्केट साठी ब्रह्मपुरी शहर दूर पडत असल्याने आरमोरी ला जातात अशातच पुलावर दोन पत्री वाहतूक चालते त्यातच या रस्त्यावरील फुलावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ राहतअसून समोरून ट्रक ट्रॅव्हल्स व इतर चार चाकी वाहन मार्गक्रमण करत असताना बाजूला उभे राहण्यासाठी अशावेळी कटळयाची नितांत गरज भासते मात्र आता ते कटरे मोडकळीस आल्याने प्रवास करताना नागरिकात भीतीचा संभ्रम पसरला असतो.

पण आरमोरी ब्रह्मपुरी येथे अत्यंत अत्यावश्यक कामासाठी गेल्याशिवाय गत्यंतर नसणाऱ्या ये जा करणाऱ्या प्रवाशांना मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो सदर संभाव्य मागणी लक्षात घेऊन गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याच्या मध्यभागी व सीमा निश्चित करणाऱ्या या पुलावरील कटरे ज्या संबंधित दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी वस्तुस्थिती लक्षात घेऊन संबंधित ज्या जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रात हा पूल असेल त्यांना कळवून त्वरित कटरे बसवून देण्याची मागणी आता येणारे जाणारे प्रवासी नागरिक करू लागले आहेत.