महाराष्ट्र विकास विद्यार्थी आघाडी च्या भविष्यातील टाळे ठोकून करण्यात येणाऱ्या आंदोलनाची घेतली दखल खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अदा करण्याचे आदेश पारित

28

🔸विजय खुपसे-पाटील यांच्या प्रयत्नास यश

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.14मे):-राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी ज्यांचे प्रवेश जागेवर प्रवेश फेरी मध्ये झाले होते आशा विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे मिळणाऱ्या राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता शिष्यवृत्ती योजना सरकारने अचानक बंद केल्याने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जोराचा आर्थिक फटका ऐन कोरोना च्या महामारी मध्ये बसू लागला.अशा परिस्थितीत शिष्यवृत्ती मिळणार नाही.

म्हणून बऱ्याच खासगी महाविद्यालयांनी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून उर्वरित फी वसुली साठी तगादा लावल्याने महाराष्ट्र विकास विद्यार्थी आघाडी ने सदर प्रकरणात लक्ष घालून राज्यातील विद्यार्थ्यांना एकत्र करून सरकारच्या विद्यार्थी विरोधी धोरणास विरोध करून सरकारने ने शिष्यवृत्ती रद्द करण्याचा निर्णय मागे घेऊन सदर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुर्ववत चालु ठेवावी.

यासाठी लढा उभा करून संबंधित कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा विजय खुपसे-पाटील यांनी दिला होता.यावेळी खुपसे-पाटील यांच्या भविष्यातील आंदोलनाची दखल घेत सरकारने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देण्याचा निर्णय मागे घेऊन शिष्यवृत्ती योजना पूर्ववत चालू ठेवण्याचे आदेश पारित केले.व विद्यार्थी वर्गातून खुपसे. पाटील यांचे व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.