डॉ.बि.आर.आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव अनिल भाऊ जवादे यांचेकडून मुस्लिम भगिनींना ईदच्या पर्वावर मेवावाटप

30

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.14मे):-कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात सर्वत्र संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.गेल्या एक वर्ष्यापेक्षा जास्त कालावधीपासून संचारबंदी लागू असून अनेक छोटे व्यावसायिक,फुटपाथ दुकानदार,हातमजूरी करणाऱ्यांची आर्थिक परिस्थिति हलाखीची झाली आहे.अशातच मुस्लिम धर्मियांचा रमजान समाप्त होत असून उद्या ईद साजरी करणार आहेत.

परंतु आर्थिक कारणामुळे अनेक मुस्लिम बंधु भगिनींना ईद साजरी करणे अशक्य असल्याने शहरातील सहृदयी नेते तसेच डॉ.आंबेडकर संस्थेचे सचिव अनिल जवादे यांनी काल दि.१२ रोजी शहरातील ५० कुटुंबियांना पवित्र ईद साजरी करण्यासाठी सुखामेवा व इतर वस्तुच्या किटचे वाटप केले.सदर किट स्विकार करतांना या मुस्लिम भगिनींनी श्रीयुत अनिल जवादे यांचे शतशः आभार मानले.