मांदुर्णे गावात सरपंच डी.जी. पाटील यांच्याकडून स्व खर्चाने 300 कुटुंबांना सॅनिटायझर व मास्क वाटप

31

✒️चाळीसगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चाळीसगांव(दि.16मे):- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामपंचायत मांदुर्णे ग्रामपंचायत ने सदर साथ पसरू नये यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी पंचायत समिती सदस्य सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रुग्ण संख्या जास्त असलेल्या नवेगावातील 300 कुटुंबांना सरपंच श्री.दगडू गणपत पाटील यांनी स्व खर्चातून एक सॅनिटायझर बॉटल व मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत सदस्य सुनीलबापू पाटील यांनी स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या असे मार्गदर्शन करून अनावश्यक बाहेर न पडण्याचे आव्हान ग्रामस्थांना केले. सरपंच दगडू पाटील व उपसरपंच नामदेव आण्णा पाटील यांनी अजून बऱ्याच उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगून ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आव्हान केले.

सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यासाठी सदस्य सदस्य राजेंद्र पाटील,गोरख पाटील, पोलीस पाटील -विष्णू पाटील, कैलास पाटील,आनंदा पाटील ,धोंडा नाईक,अन्वर मन्सूरी,लक्ष्मण पाटील,हिलाल महाजन,ईश्वर भिल्ल व ग्रा.पं. कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.गावातील तरुण प्रमोद पाटील,दगडू पाटील व पंकज पाटील यांनी सॅनिटायझर खरेदी व ने आण साठी मदत केली. गावातील समाधान पाटील, गोरख पाटील व राजेंद्र पाटील यांनी ग्रामपंचायत यांना सहकार्य केले.येत्या काळात गावात डॉक्टर कॅम्प लावून ग्रामस्थांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत कडून सांगण्यात आले.
घरात राहा…सुरक्षित राहा…. असे प्रतिपादन सरपंच दगडू गणपत पाटील यांनी केले.