दहा दिवसांत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यु

27

✒️राहुल कासारे(अंबाजोगाई सर्कल,प्रतीनीधी)मो:;9763463407

घाटनांदुर(दि.16मे):-आंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथील मागील दहा दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला, असून मृतांमध्ये आई वडील व एकुलत्या मुलाचा सामावेश आहे. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली असून, आज पर्यंत च्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. या हृदयद्रावक घटनेचा अधिक वृत्तांत असा की घाटनांदूर येथील
ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुहास दिनकर गोडबोले व 51 वर्षे यांना लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, सुरुवातीला त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला मात्र नंतरच्या काळात त्यांना श्वसनाचा जास्त त्रास झाल्याने आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तब्बल 22 दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली मात्र ही झुंज अखेर अपयशी ठरली तत्पूर्वी त्यांच्या आई कमलबाई दिनकर गोडबोले यांना ही त्रास जाणवत असल्याने आंबेजोगाईच्या को बीड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे ही आठ आठ दिवसापूर्वी उपचारादरम्यान निधन झाले तर दिनकर मेसाजी गोडबोले यांचे आज दिनांक 15 रोजी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले आहे. दहा दिवसांत एकाच कुटुंबातील तिघांच्या निधनाने गोडबोले कुटुंबियांवर काळाने अचानक घाला केल्याने हा परिवार पोरका झाला असून, कुटुंबातील आधारवड कोसळला आहे. सुहास गोडबोले यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. पुरोगामी संदेश टीम परिवार त्यांच्या सहभागी आहे.