व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा सह ४ व्यापाऱ्याची पोलिसात तक्रार दाखल

36

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.१७मे):- सोमवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास महाराष्ट्र माझा न्यूज चे संपादक कैलाश शर्मा हे बाजार रोड, साई मंदिर जवळून आपल्या पत्रकारितेच्या कामाकरीता पैदल आपल्या ऑफिस कडे जात असताना किशोर ट्रेडर्स चे संचालक वलय किशोर चन्नावार, अलंकार वस्त्रालय चे संचालक नरेश उर्फ बाल्या चन्नावार यांनी शर्मा यांना थांबवून आमची दुकाने लॉक डाउन मध्ये चालू राहतात अशी तक्रार का केली असे तसेच अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन भर रस्त्यावर वाद घालत धक्काबुक्की केली.

या घटनेची तक्रार दाखल करायला संपादक कैलाश शर्मा ताबडतोब पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करताच व्यापारी संघटनेचा अध्यक्ष रवी चन्नावार आपल्या सह नरेश उर्फ बाल्या चन्नावार(अलंकार वस्त्रालय),वलय किशोर चन्नावार(किशोर ट्रेडर्स ),अमित कडीवाल(अमित जनरल स्टोअर्स),समीर अजानी(सोनी मोबाईल) या ४ दुकानदारांना घेऊन आला आणि या पाचही लोकांनी ठाणेदार मंडलवार आणि ठाण्यातील कर्मचाऱ्यांसमोर संपादक कैलाश शर्मा यांना पुन्हा अश्लील शिवीगाळ करून तुला जंगलात नेऊन कापून फेकून देऊ,अशी धमकी देऊन ठाण्यातच गुंडागर्दी करण्याचा प्रयत्न केला.

कैलाश शर्मा यांनी सविस्तर घटनेची तक्रार दाखल करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे,आणि पत्रकार सुरक्षा अधिनियम प्रमाणे कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत केली आहे.सदर घटनेची संपूर्ण हकीकत ठाण्यात लागलेल्या सीसी टीव्ही कैद झालेली असून ,सदर सीसीटीव्ही तपासून कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रनील गिल्डा यांनी दिली आहे.